Rice Species : शेतकऱ्याने केली तांदळाची नवीन प्रजाती विकसित; मधुमेहींसाठी ठरतीये गुणकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यात सध्या शेतकरी आपआपल्या पातळीवर नवनवीन संशोधन (Rice Species) करताना दिसून येत आहेत. कधी शेतीतील कामे सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जुगाड करून अनेक साधने बनवलेले पाहायला मिळत आहे. तर कधी शेतकरी विदेशी फळांची शेती करत मोठा नफा कमवताना दिसत आहे. मात्र आता ओडीसामधील एका शेतकऱ्याने तांदळाची नवीन प्रजाती विकसित केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तांदळाची ही प्रजाती (Rice Species) मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी प्रभावी असल्याचे मानले जात आहे.

ओडीसा राज्यातील इंजानपुर गावात राहणाऱ्या उमेश चंद्र नायक या शेतकऱ्याने तांदळाची ही नवीन प्रजाती (Rice Species) विकसित केली आहे. शेतकरी उमेश चंद्र नायक यांनी विकसित केलेली ही प्रजाती मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी गुणकारी आहे. उमेश चंद्र यांनी शेती व्यवसाय करण्यासाठी आपल्या औषध निर्माण कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता. ते एका फार्मास्यूटिकल कंपनीमध्ये काम करत होते. मात्र शेतीतील आवडीमुळे त्यांनी शेती क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा निर्धार मनाशी बाळगला. यातूनच त्यांनी ‘तेलंगाना सोना आरएनआर 15048’ ही तांदळाची नवीन प्रजाती विकसित केली आहे.

नवीन प्रजातीची वैशिष्ट्ये (Rice Species Developed By Farmer)

तांदळाची ही नवीन प्रजाती मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरली आहे. शेतकरी उमेश चंद्र नायक यांनी ही नवीन प्रजाती विकसित करत, डॉक्टरांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. याशिवाय ते शेतकऱ्यांना या प्रजातीची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. या नवीन तांदळाच्या प्रजातीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे ५० टक्के इतके आहे. जे पारंपरिक तांदळाच्या प्रजातींमध्ये आढळणाऱ्या कार्बोहायड्रेटच्या प्रमाणापेक्षा 80 टक्के कमी आहे. ज्यामुळे ही नवीन तांदळाची प्रजाती मधुमेहाचा आजार असणाऱ्या व्यक्तींचा एक परिपूर्ण आहार म्हणून समोर आली आहे. बाजारात मधुमेहाच्या आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी जे तांदूळ भेटतात. त्यापेक्षा हा तांदूळ 260 रुपये किलो इतक्या किफायती दरात उपलब्ध असल्याचेही शेतकरी उमेश चंद्र नायक यांनी म्हटले आहे.

निर्णय योग्य ठरल्याचे समाधान

शेतकरी उमेश चंद्र नायक यांनी शेती करण्यासाठी नोकरी सोडली. मात्र आता त्यांचा निर्णय योग्य ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते सध्या मोठ्या प्रमाणात धानाची शेती करत असून, त्यांना या नवीन प्रजातीच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात फायदा देखील मिळत आहे. त्यांनी आपल्या या नवीन प्रजातीच्या माध्यमातून शेतीचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ते अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रजातीच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे.

error: Content is protected !!