Rose Farming : गुलाबाच्या शेतीतून महिन्याला 40 लाखांची कमाई; पुण्यातील शेतकरी झाले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । बऱ्याच ठिकाणी गुलाबाच्या शेतीचे पॉलिहाऊस आपण बघतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का? गुलाबाच्या शेती मुळे (Rose Farming )एखादा शेतकरी श्रीमंत झाला. होय, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील बरेच शेतकरी मालामाल झालेत ते देखील फक्त गुलाबाच्या शेतीमुळे… त्यामुळे ही शेती नेमकी काय आहे? ती कशी करायची आणि तुम्हाला यातून किती रुपयांचा आर्थिक फायदा मिळेल हे आज आपण पाहूया….

डच गुलाबाची शेती –

पुण्यातील मावळ या ठिकाणी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या धान्याची फळांची शेती सोडून गुलाबाची शेती करणं सुरू केलं आहे. हा गुलाब म्हणजे साधासुधा गुलाब नसून डच गुलाब आहे. ज्याचा सुगंध आणि रस उसापेक्षाही गोड लागतो. या शेतकऱ्यांनी लावलेले डच गुलाब नेदरलँड, जपान, ऑस्ट्रेलिया मध्ये विक्री होत आहेत. आणि शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळत आहेत. या डच गुलाबाची शेती ही फक्त पॉलिहाऊस मध्येच केली जाते. या पॉलिहाऊसचं तापमान 32 ते 35 डिग्री सेल्सिअस असणं गरजेचं आहे. याचबरोबर आद्रता 65 ते 75 टक्के एवढी हवी. यामुळे डच गुलाबाचे उत्पादन चांगले होते.

महिन्याला 40 लाख रुपये कमवतात –

पुण्यातील शेतकरी मुकुंद ठाकर यांनी डच गुलाब यांची शेती करण्यासाठी एक संघ बनवला, ज्यामध्ये 17 शेतकरी असून हे शेतकरी 55 एकर जमिनीवर डच गुलाबाची शेती करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व शेतकरी दिवसात 2 लाख गुलाबाचे उत्पादन काढतात आणि महिन्याला तब्बल 40 लाख रुपये कमवतात. व्हॅलेंटाईन डे ला गुलाबाचे महत्त्व जास्त असतं. त्यावेळी दररोज 3 लाख ते 4 लाख गुलाबाचे उत्पादन शेतकरी काढतात. यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला त्यांनी 12 लाख गुलाब सप्लाय केले होते. त्यातील ८ लाख गुलाब विदेशी पाठवण्यात आल्याचे मुकुंद ठाकर यांनी सांगितलं.

पहिल्यांदा कधी केली सुरुवात –

2007 मध्ये मुकुंद ठाकर यांनी पहिल्यांदा पुण्याजवळील येवले या गावात 10 गुंठा जमिनीवर पॉलिहाऊस बनवून डच गुलाबाची शेती सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी संघ बनवून आपली शेती वाढवत नेली. साधारणपणे एक एकर परिसरात पॉलिहाऊस बनवण्यासाठी 70 लाख रुपये खर्च येतो. पण यावर राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्या अंतर्गत 50 टक्के सबसिडी दिली जाते. तुम्ही सुद्धा गुलाबाच्या या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करू शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला पॉलिहाऊस उभारावे लागेल.

error: Content is protected !!