Sabudana Farming : साबुदाणा कसा तयार होतो? झाडाला येतो की कारखान्यात तयार होतो? वाचा..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरातील हिंदू समाजात उपवासाला खूप महत्व असते. यात प्रामुख्याने उपवासाच्या दिवशी साबुदाणा (Sabudana Farming) खिचडी खाण्याची प्रथा आपल्याकडे रूढ झाली आहे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर आणि साबुदाणा चकल्या अनेक पदार्थ उपवासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, आता हा साबुदाणा नेमका कसा तयार होतो? साबुदाणा पीक (Sabudana Farming) कसे घेतले जाते? साबुदाणा हा थेट झाडाला येतो की कारखान्यात त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात? या सर्व बाबींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

रताळ्याच्या झाडाशी साधर्म्य (Sabudana Farming In India)

तसे पाहता साबुदाणा पिकाची लागवड ते साबुदाणा निर्मिती ही बरीच मोठी प्रक्रिया आहे. टॅपिओका अर्थात साबुदाणाचे झाड (Sabudana Farming) हे उष्णकटिबंधीय वातावरणातील झाड असून, या झाडाच्या मुळांपासून साबुदाणा तयार होतो. हे टॅपिओकाचे झाड काहीसे रताळ्याच्या झाडासारखे असते. मात्र, टॅपिओका या झाडाच्या मुळ्या या रताळच्या झाडांपेक्षा लांब आणि जाड असतात. टॅपिओका झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर, त्याची काढणी केली जाते.

मुळांपासून बनतो साबुदाणा

ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात उसापासून साखर निर्मिती करण्यासाठी साखरेचे कारखाने एकवटलेले आहे. अगदी त्याच पद्धतीने या टॅपिओका झाडाच्या मुळांपासून साबुदाणा तयार करण्यासाठी कारखाना उभारलेला असतो. शेतकऱ्यांना शेतामध्ये उत्पादित केलेली रताळ्यासारखी टॅपिओकाची मुळे कारखान्यात ट्रकमधून भरून कारखान्यात आणली जातात. त्या ठिकाणी ही मुळे स्वच्छ करून, त्यांच्या साली काढली जातात. त्यानंतर तुकडे करून मोठ्या साच्यात टाकले जाते. त्यात मुळांचा बारीक चूर केला जातो. आणि त्यापासून गोलमटोल साबुदाणा तयार होतो.

कुठे घेतले जाते साबुदाणा पीक?

टॅपिओका अर्थात साबुदाणा झाडाची लागवड ही केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या उष्णकटिबंधीय राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. काही प्रमाणात मध्यप्रदेश या राज्यामध्ये देखील हे पीक घेतले जाते. विशेष म्हणजे साबुदाणा पिकाची लागवड ही कमी पाण्यात आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये देखील केली जाऊ शकते. मात्र, टॅपिओकाच्या काढणीनंतर साबुदाणा निर्मितीसाठी कारखाना जवळ असणे आवश्यक असते.

साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न आणि जीवनसत्वे असतात. कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्याने साबुदाणा खाणे हे हाडांच्या आजारासाठी उत्तम मानले जाते. तर कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्याने साबुदाणा हा ऊर्जादायी मानला जातो. ज्यामुळे तो उपवासाच्या दिवशी खाल्ला जातो. मात्र, मधुमेहाचा आजार असलेल्यांना साबुदाणा न खाण्याची चेतावणी डॉक्टर देत असतात. कारण मधुमेहींसाठी तो उत्तम मानला जात नाही.

error: Content is protected !!