Sahiwal Cow : 30 ते 40 लिटर दूध देणारी सहिवाल गाय, महाराष्ट्रात कशी आली? वाचा संपूर्ण माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने (Sahiwal Cow) देवणी, लाल कंधारी, खिलार आणि कोकण कपिला या देशी गायींच्या प्रमुख जाती आहेत. गिर, सहिवाल, थारपारकर या गायींच्या प्रजातीच्या अन्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्या आहेत. यातील सहिवाल या प्रजातीची गाय ही पंजाब, हरियाणा आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या सिंध प्रांतातून महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. इंग्रजांच्या काळात त्यांनी भारतीय संपूर्ण प्रदेशावर ठिकठिकाणी वस्त्या उभारल्या. त्यावेळी दुधासाठी इंग्रजांनी सहिवाल गायी महाराष्ट्र भूमीवर आणल्या. ज्या आज वातावरणानुरूप जुळवून अधिकाधिक दूध देताना दिसून येतात. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सहिवाल गायीच्या (Sahiwal Cow) माध्यमातून दुग्ध व्यवसाय करत आहेत.

सहिवाल गायीचे मुळस्थान (Sahiwal Cow In Maharashtra)

सहिवाल या गायीला मुलतानी, लोला, मोंटगोमरी आणि लाम्बी बार या नावांनी देखील ओळखले जाते. या गायीचे मुळस्थान हे पाकिस्तानमधील पंजाब, मुलतान व सिंध प्रांत असून, भारतातील पंजाब या राज्यात ती विशेषत्वाने आढळते. सध्याच्या घडीला गायीची ही जात दूध देण्यासाठी देशभर प्रसिद्ध असून, ती लाल रंगाची असते. गोल शिंगे, लांब मान अशी तिची ओळख आहे. तिचे एकूण वजन हे जवळपास 300-350 किलो इतके असते.

किती देते दूध?

भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी जनावरे पाळली जातात. ही जनावरे प्रामुख्याने त्या-त्या भागातील हवामान, वातावरण आणि उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून पाळली जातात. मात्र सध्याच्या घडीला सहिवाल या उत्तरेकडील प्रजातीच्या गायीने महाराष्ट्रातील वातावरणात जुळवून घेतले आहे. कारण जवळपास 100 वर्षांच्या कालखंडात सहिवाल गायीच्या जनुकांमध्ये राज्यातील वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सहिवाल ही गाय (Sahiwal Cow) सर्वोत्तम दूध देणारे गाय मानली जात आहे. आपल्या एका प्रजनन काळात ही गाय 1600 ते 2750 किलोग्रॅम इतके दूध देते. तर या जातीच्या गायीची चांगली काळजी घेतल्यास, ती दररोज दोन वेळचे नियमित 30 ते 40 लिटर दूध देते. या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 4.9 टक्के इतके सर्वाधिक आढळून येते.

सहिवाल गायीची वैशिष्ट्ये

  • कोणकोणत्या नावाने ओळखली जाते – मुलतानी, लोला, मोंटगोमरी, लाम्बी बार
  • मुळस्थान – पाकिस्तानातील पंजाब, मुलतान व सिंध प्रांत. तसेच भारतातील पंजाब राज्य.
  • शारीरिक ठेवण – गोल शिंगे, लांब मान, लाल रंग. 300 ते 350 किलो वजन.
  • दूध उत्पादन – एक प्रजनन काळात 1600 से 2750 किलोग्रॅम, फॅट 4.9 टक्के.
error: Content is protected !!