Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे.

सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra)

  • शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीबाबत वर्षानुवर्षे समाजामध्ये असणारे वादविवाद या योजनेतून मिटणार
  • नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार
  • न्यायालयातील वादांची संख्या कमी होणार
  • भूमाफियांचा हस्तक्षेप (Land Mafia Interference) टाळता येणार
  • शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होणार

सलोखा योजनेचे अटी व शर्ती (Terms & Condition of Salokha Yojana Maharashtra)

  • योजना फक्त शेतजमि‍नीसाठी (Agriculture Land) लागू आहे.
  • शेतजमि‍नीची अदलाबदल किमान 12 वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये एकाच गावामध्ये राहणार्‍या व शेती करणाऱ्या शेतकर्‍यांचे हे परस्परांकडे मालकी व ताबा असल्या बाबतची नोंदणी ही तलाठी ग्रामपंचायत मध्ये असणे आवश्यक आहे
  • सलोखा योजनेमध्ये दस्तामध्ये अधिकारी अभिलेखात समावेश शेवे वर्ग शेरे अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश आवश्यक आहे.
  • या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्या शेतकर्‍याचा ताबा हा पहिल्याकडे असणार्‍या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये किती फरक आहे याची नोंदणी करून ते योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

आवश्यक पात्रता (Eligibility For Salokha Yojana Maharashtra)

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी (Citizen Of Maharashtra) असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा अर्जदार यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मोठ्या मालमत्तेची चार चाकी गाडी नसावी.
  • अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समाजातील नागरिकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा? (Application For Salokha Yojana Maharashtra)

  • तलाठ्याकडे साध्या कागदावर अर्ज करा
  • अर्जात सर्व्हे नंबर, चतु:सीमा गट नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्या
  • पंचनाम्याच्या वेळी 2 सज्ञान साक्षीदारांची उपस्थिति आवश्यक
  • दोन्ही गटातील सर्व सहभागी शेतकर्‍यांची दस्त नोंदणीसाठी संमती आवश्यक

अर्ज कुठे करावा?

जवळच्या तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन साध्या कागदावर शेतकरी अर्ज करू शकतात.

सलोखा योजना 2 वर्षांसाठी लागू राहणार आहे याची नोंद घ्यावी

error: Content is protected !!