Sandalwood Farming : अशी करा सफेद चंदनाची शेती; काही वर्षांमध्ये मिळेल कोट्यवधींचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये अशी अनेक उत्पादने (Sandalwood Farming) असतात. ज्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. यामध्ये लाकूड विकून विकूनही चांगला नफा मिळू शकतो. पण ते लाकूड मौल्यवान असावे लागते. परिणामी, तुम्हाला अधिक किंमत असलेल्या लाकडाची शेती करायची असेल तर पांढऱ्या चंदनाची शेती हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पांढऱ्या चंदनाच्या लागवडीतून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. सध्याच्या घडीला पांढऱ्या चंदनाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आज आपण पांढऱ्या चंदनाच्या लागवडीबाबत (Sandalwood Farming) जाणून घेणार आहोत.

किती रोपे लागतात? (Sandalwood Farming Crores Of Income Few Years)

तुम्हांला जर एका एकरात पांढऱ्या चंदनाची शेती (Sandalwood Farming) करायची असेल तर तुम्हांला एकरी 350 रोपांची आवश्यकता असणार आहे. पांढऱ्या चंदनाची रोपे लावण्यासाठी दोन रोपांमध्ये १० फूट अंतर असावे लागते. यासोबतच झाडांना वेळोवेळी सिंचनाची व्यवस्था करावी. शेतातून पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी. सफेद चंदनाच्या लागवडीबरोबरच तुरीचे आंतरपीक घेतल्यास चंदनाची झाडे वेगाने वाढत असल्याचे सांगितले जाते. तुरीच्या झाडांमुळे चंदनाच्या मुळांना मातीमधून नायट्रोजनची पूर्तता होते. पुरेशा प्रमाणात नायट्रोजन मिळाल्यामुळे लाकडातील सुगंधी तेलांचे प्रमाण वाढते.

माळरान जमिनीवरही लागवड

चंदन लागवडीचे (Sandalwood Farming) वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागवड नापीक, खडकाळ किंवा माळरान जमिनीवरही करता येते. अर्थात नापीक जमीन चंदन लागवडीच्या माध्यमातून सहजपणे वापरात आणली जाऊ शकते. पांढऱ्या चंदनाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा न होणारी जमीन योग्य मानली जाते. त्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होते. इतकेच नाही तर मुरमाड जमीन चंदन लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. असे असले तरी चंदनाच्या लागवडीनंतर शेतकऱ्यांना कमाईसाठी मिळण्यासाठी बरीच वर्ष वाट पाहावी लागते.

किती वर्षात मिळते उत्पन्न?

सफेद चंदनाच्या एका झाडाला पूर्ण परिपक्व होण्यासाठी 36 ते 40 वर्षे लागतात. परंतु, शेतकरी 25 ते 30 वर्षे वयाची झाडे देखील विक्री करू शकतात. या काळात शेतकरी चंदनाच्या लागवडीदरम्यान दुसरे कोणतेही आंतरपीक देखील घेऊ शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीतून नियमित उत्पन्न मिळत राहील. साधारणपणे 25 ते 30 वर्षांनंतर एका चंदनाच्या झाडातून शेतकऱ्यांना, एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. तर झाड 36 ते 40 वर्षांचे असल्यानंतर कंपनी केल्यास त्या झाडापासून 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. कारण वयाच्या 36 व्या वर्षी सफेद चंदनाच्या झाडाची जाडी वाढते आणि झाड पूर्णपणे परिपक्व होते.

error: Content is protected !!