संजय गांधी निराधार योजना : राज्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. मात्र ५ जुलै २०२३ रोजी या अर्थसाह्यात वाढ करण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन लाभार्थ्यांसाठी दरमहा १००० रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसाह्यामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना आता दर महिन्याला १५०० रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.
सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांबरोबरच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू असणार आहे.
लाभार्थ्यांसाठी योजनेमध्ये बदल
- हयात प्रमाणपत्राच्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात येणार आहे.
- तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय / निमशासकीय / खासगी) मुलाचे व कुटूंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात येणार आहे. याबाबत दिनांक २० ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे.