Tractor Trolley : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tractor Trolley : अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा फायदा आज लाखो शेतकरी घेताना दिसत आहेत. यांच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना सरकार आता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खरेदीसाठी अनुदान देणार आहे.

सरकारी योजनेला मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत आता यावर्षीपासून राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत आता शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात. त्याशिवाय शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांनाही अर्ज करता येणार आहे.

जर तुम्हाला राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्रॉली अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. (Tractor Trolley)

सध्या शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी शेतातील कामांसाठी विविध यंत्रांचा वापर करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर महाडीबीटीच्या पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

किती अनुदान मिळणार?

माहितीनुसार, शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी 45 ते 50 टक्के एवढे अनुदान मिळणार आहे. यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना 45 टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

या ठिकाणी मिळेल सरकारी योजनेची अचूक माहिती –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवायची असेल तर लगेचच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.

error: Content is protected !!