Sarkari Yojna : आपल्याकडे अनेकजण शेती हा व्यवसाय करतात. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याच गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी सरकार देखील अनेक योजना राबवत असते. या योजनांपैकी सरकारची एक योजना म्हणजे डीपी योजना होय. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी दिली जाते. आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांना कायमच विज टंचाईचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा वीज उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास नष्ट होत असतो. विजेअभावी पिकांना पाणी वेळेवर मिळत नाही; त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जातात. याच पार्श्वभूमीवर राज्यांमधील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारकडून योजनेच्या माध्यमातून एक स्वतंत्र ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही रक्कम देखील भरावी लागत आहे.
काय आहे नेमकी योजना?
डीपी योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जातो. यामध्ये सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रति एचपी तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपी खर्च भरावा लागतो. हा खर्च भरल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 11 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये अतिरिक्त खर्च हा राज्य सरकारच्या माध्यमातून भरला जातो.
काही शेतकऱ्यांकडे जमीन कमी असते उदाहरणार्थ जर शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागेल. आता या योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात ते खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुकची झेरॉक्स, पॅन कार्ड, सातबारा उतारा आणि आठ अ चा उतारा ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लाभार्थी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असल्यास असल्यास जातीचा दाखला देखील गरजेचा आहे. तुम्ही या सर्व कागदपत्रांची योग्यरीत्या पूर्तता केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना Mahadiscom च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे एग्रीकल्चर क्षेत्र, हॉर्स पावर, मोबाईल नंबर, अर्जदारांची माहिती ई-मेल इत्यादी माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे टाकणे गरजेचे आहे.
या ठिकाणी मिळेल सर्व सरकारी योजनांची माहिती
शेतकऱ्यांसाठी सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना काही योजनांची माहिती नसते. मात्र आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला यासाठी एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे. हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात? योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? या सर्व बाबींची माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.