शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; सर्पगंधाच्या लागवडीतून मिळवा एकरी 4 लाखांपर्यंत नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । शेतकरी आता पारंपारीक शेतीची पद्धती सोडून आधुनिकतेची कास धरत आहे. शेतकऱ्यांचा पिकं घेण्याचा दृष्टिकोन बदलत चाललत असल्याचे पहायला मिळतेय. भाजीपाला पिकाबरोबर शेतकरी आता औषधी वनस्पतींची लागवडही मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसुन येत आहे. औषधी वनस्पतींची लागवड करताना जमेची बाजू अशी आहे की यामध्ये उत्पादन खर्च कमी आणि जास्त नफा मिळत आहे. औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा ही महत्वाची वनस्पती असून, देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, तमिळनाडू आणि ओरिसा या राज्यांत सर्पगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सर्पगंधा या औषधी वनस्पतीची लागवड मुख्यत्वे 3 पद्धतीने केली जाते. यामध्ये,
1) कलम पद्धतीने लागवड: या पद्धतीमध्ये कलम बनवून ती तीन पीपीएम’च्या ‘इंडोल ऍसिटिक ऍसिड’मध्ये 12 तासांपर्यंत बुडवून ठेवली जाते. त्यानंतर ती लावली जाते.
2) मुळ अंकुरीत करून लागवड: या पद्धतीत मूळ माती भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवली जातात. त्यानंतर जवळ-जवळ एक महिन्यानंतर सर्पगंधाची मुळे अंकुरित झाल्यानंतर त्यांची लागवड केली जाते.
3) बियांची पेरणी पद्धती: तिसऱ्या पद्धतीत बियांची पेरणी केली जाते. यामध्ये तिसरी पद्धती सर्वात चांगली पद्धत मानली जाते. यासाठी सरपगंधाच्या चांगल्या बियाण्यांची निवड करणे आवश्यक आहे.

नर्सरीमध्ये रोपाला जेव्हा चार ते सहा पाने येतात त्यावेळी त्याची शेतीत लागवड केली जाते. एकदा लागवड केल्यानंतर दोन वर्षांपर्यंत या वनस्पतीचे उत्पादन घेता येते. या वनस्पतीला फुल आणि फळ आल्यानंतर या पासून तयार होणाऱ्या बियांचा औषधासाठी उपयोग होतो. ही प्रक्रीया दोन वर्षापर्यंत चालू राहते यातून शेतकऱ्यांना ४ लाखापर्यंत नफा मिळतो. याची लागवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा घेऊ शकतो.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!