Satara News : पाटण तालुक्यातील (जि. सातारा) ढेबेवाडी विभागांमधील वाल्मीक पठारावर जनावरे हळव्या रोगाने मरू लागली आहेत. त्यामुळे पशुपालक हवालदिल झाला आहे. पाटण तालुक्यात तामिने, पानेरी, सळवे, पळशी या गावातील पशुधन धोक्यात आले असून जवळपास २४ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे पशुपालकावर आभाळ कोसळले आहे. हळवा (बोटोलिझम) नावाच्या आजाराने पठारावरती शिरकाव केल्याने या विभागातील पानेरी तामिनी, पाळशी आणि सळवे या गावातील आठवड्याभरात वीस शेतकऱ्यांची सुमारे २४ जनावरे दगावली आहेत. यामध्ये प्रामुख्याने १६ गाय, १ बैल, ६ वासरु आणि १ खोंड या पशुधनाचा समावेश आहे.
तुमच्या गावाजवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांचा नंबर कसा मिळवाल?
शेतकरी मित्रांनो अनेकवेळा आपले जनावर आजारी पडले कि आपण डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करतो मात्र नेटवर्क इशू किंवा इतर तातडीच्या ठिकाणी डॉक्टर व्यस्त असल्याने त्यांना आपल्याकडे येण्यास उशीर लागतो. परंतु अर्जंट असेल तर अशावेळी आपली चांगलीच तारांबळ उडते. ऐनवेळेला नवीन डॉक्टर शोधणे अवघड बनते. मात्र आता तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील पशु वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी एका क्लिकवर संपर्क करता येणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करायचे आहे. इथे तुम्हाला तुमच्या गावाजवळील डॉक्टरांशी संपर्क करण्याची सोया आहे. यासोबत शेतीविषयक अनेक सेवा या अँपवर मोफत दिल्या जातात. जनावरांची खरेदी विक्री, शेतमालाचे बाजारभाव, जमीन मोजणी अशा गोष्टी तुम्ही या अँपच्या मदतीने सहज करू शकता.
पठारावरील शेतकऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पशुपालन हा व्यवसाय आहे. हळव्या आजारामुळे जवळपास दुधाळ गाईंचा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गावर आभाळ कोसळले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी पशुपालकांकडून मागणी होऊ लागली आहे.
जनावरांचे केले लसीकरण
या परिसरामध्ये हळवा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे निदर्शनास येताच पानेरी आणि तामिने या ठिकाणी जनावरांना तातडीने लसीकरण व औषध वाटप करण्यात आले आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस चारा देणे गरजेचे आहे, असे सणबुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टोणपे यांनी सांगितले आहे.