Seed Production Program Reservation Scheme: खरीप हंगामासाठी महाबीजची ‘बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना’; शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आगामी खरीप हंगामासाठी (Seed Production Program Reservation Scheme) बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याची घोषणा महाबीजने (Mahabeej) केली आहे. शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनेमध्ये (Seed Production Program Reservation Scheme) सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस (Seed Production Program Reservation Scheme) 1992-93 च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या योजनेमुळे बीजोत्पादक व बीजोत्पादन गावांची निवड करण्यास मदत होऊन आरक्षित बीजोत्पादन कार्यक्रमासाठी वेळेवर पायाभूत बियाणे पुरवठा करणे सुद्धा फायदेशीर झाले आहे. त्याच उद्देशाने महामंडळाने या खरीप हंगामात (Kharif Season) प्रमाणित (Certified Seeds) तथा पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना (Seed Production Program Reservation Scheme) राबवली जात आहे.

कमीत कमी गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर तथा बीज प्रक्रिया केंद्रानजीकच्या गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये ‘गाव’ हा प्रमुख घटक गृहीत धरलेला असून, 100 टक्के क्षेत्र तपासणी करून, तसेच गाव संख्या कमी असल्यामुळे बीजोत्पादकांना वेळोवेळी आवश्यक ते संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन (Technical Guidance) करून उत्पादित बियाण्यांची उच्चतम गुणवत्ता (Seed Quality) राखणे सोईचे होईल, हा उद्देश ठेवण्यात आला.

शंभर रुपये प्रति एकराप्रमाणे आरक्षण रक्कम भरून शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये सहभागी होता येईल.

एका गावामध्ये पीक, वाण, दर्जा मिळून भाजीपाला पिकांसह कमीत कमी 50 एकर बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रक्रिया, योग्य कच्चे बियाणे, लॉट साइजकरिता तूर, तीळ, ज्यूट वगळून इतर पिकांचा 3 एकरांपेक्षा कमी कार्यक्रम न राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जास्तीत जास्त बीज गुणांक (SMR) प्राप्त होण्याच्या दृष्टीने संपूर्ण पायाभूत बीजोत्पादन (Foundation Seed Production) कार्यक्रम सुरुवातीलाच योग्य बीजोत्पादक व योग्य क्षेत्राची निवड करून एकाच तालुक्यात राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) तथा तृणधान्य कडधान्याचे उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन वाणांची बियाणे (New Seed Variety) उपलब्धता वाढविण्याचे दृष्टीने नवीन वाणांचा बीजोत्पादन (Seed production) कार्यक्रमात समावेश केला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये (Features Of Seed Production Program Reservation Scheme)

कालावधी: 10 ते 30 एप्रिल 2024

ध्येय: बीजोत्पादक आणि बीजोत्पादन गावांची निवड सुलभ करणे आणि आरक्षित बीजोत्पादन कार्यक्रमांसाठी वेळेवर पायाभूत बियाणे पुरवठा सुनिश्चित करणे.

अतिरिक्त लाभ (Benefits To Farmers)

“बीज ग्राम योजना” (Beej Gram Yojana) अंतर्गत एकाच गावात जास्तीत जास्त बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करणे.

खरीप 2024-25 मध्ये बियाणे प्रक्रिया केंद्राच्या 50 किलोमीटरच्या आत प्राधान्यक्रम देणे.

एका गावात किमान 50 एकर क्षेत्रावर भाजीपाला पिकांसह पीक, वाण आणि दर्जा यांचा समावेश करणे.

3 एकरांपेक्षा कमी क्षेत्रावरील कार्यक्रम टाळणे (तूर, तीळ, जूट सोडून).

जास्तीत जास्त बीज गुणांक (एसएमआर) मिळवण्यासाठी योग्य बीजोत्पादक आणि क्षेत्र निवडून एकाच तालुक्यात कार्यक्रम राबवणे.

नवीन वाणांचा समावेश करून त्यांच्या बियाण्याची उपलब्धता वाढवणे.

शेतकऱ्यांना (Farmers) या योजनेचा (Seed Production Program Reservation Scheme) लाभ घेण्यासाठी महाबीजच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते.

error: Content is protected !!