Seeds Fertilizers : खाद बियाणे विक्रीसाठी 10 वी पास अट; तरुणांना मोठी संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकाने बियाणे आणि खाद उद्योगाला (Seeds Fertilizers) प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता 10 वी पास तरुणांना बियाणे आणि खाद विक्री (Seeds Fertilizers) करता येणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारने 15 दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. त्यानंरच संबंधित व्यक्तीला बियाणे आणि खाद विक्रीचे दुकान सुरु करता येणार आहे. ग्रामीण भागात तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विभागाने नियमावलीतील केलेल्या (Seeds Fertilizers) या बदलामुळे कृषी पदविका धारक तरुणांसह आता 10 वी पास तरुणही बियाणे आणि खाद विक्री करू शकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून बियाणे आणि खाद विक्रीसाठी केवळ कृषी पदविका ही अट निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता रोजगाराच्या संधी उपलब्ध कारण्यासाठी त्यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार बियाणे आणि खाद विक्री व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना व्यवसायासाठीचा परवाना मिळवण्यासाठी 15 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

15 दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य (Seeds Fertilizers Regulations In India)

कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे प्रशिक्षण तरुणांसाठी हे 15 दिवसांचे प्रशिक्षण उपलब्ध असणार असून, त्यासाठी आवेदन शुल्क हे 12 हजार 500 रुपये इतके निर्धारित करण्यात आले आहे. मात्र हे 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण न केल्यास तरुणांना विक्री परवाना मिळू शकणार नाही. हे प्रशिक्षण सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आता या बदलामुळे ग्रामीण भागातील तरुण अल्प गुंतवणुकीसह हा व्यवसाय करू शकणार आहेत. या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनण्यासह रोजगाराचे नवीन माध्यम उपलब्ध होणार असून, कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!