महाडीबीटीवर शेतकऱ्यांसाठी मिळत आहेत अनुदानित बियाणे; असा घ्या फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. ह्या वेळी राज्य शासनाने अशीच एक सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे. राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये बियाणांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे आता बियाण्यावर देखील अनुदान मिळत आहे. अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आहे.

महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना एकाच ठिकाणी मिळत असतात. म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर ‘अर्ज एक शेतकरी अनेक’ ही रचना राबवली जात आहे. यामुळे सगळ्या योजना या शेतकर्यांना एकाच ठिकाणी मिळतील. आता ह्या सगळ्या योजनांमध्ये बियाण्याचा देखील समावेश केला गेला आहे. यामध्ये सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांची बियाणे अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना मिळत आहेत.

शेतकरी हा अर्ज भरण्यासाठी स्वतःचा मोबाईल, लॅपटॉप किंवा गावातील सायबर कॅफे यातील काहीही वापरू शकतात. फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी mahadbtmahait.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर शेतकरी योजना यावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यास नवीन विंडो ओपण होईल तिथे आपली सगळी माहिती भरा. आणि फॉर्म सबमिट करा. एका शेतकऱ्याला 2 हेक्टर पर्यंत बियाण्यावर सूट मिळू शकते.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!