Sericulture : रेशीम शेतीसाठी एकरी 4 लाखांचे अनुदान; पहा कसा करायचा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना (Sericulture) करावा लागतो. बहुधा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून रेशीम अनुदान योजना (Sericulture) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत रेशीम शेती  ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून एक एकरच्या लागवडीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

अशी आहे योजना (Sericulture 4 lakhs Per Acre Subsidy)

राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी साहित्याच्या मदतीने रेशीम शेती करण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने रेशीम शेतीत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी महसूल, कृषी विभाग किंवा रेशीम कार्यालयाला भेट देऊ शकता.

काय आहेत निकष?

  • लाभार्थी अल्पभूधारक असावा.
  • अनुसूचित जाती जमातीतील महिलांना प्राधान्य.
  • सिंचनाची बारमाही किंवा किमान आठ महिन्यांची सोय असावी.
  • मनरेगा कृती आराखडा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक.
  • लाभार्थी हा जॉब कार्डधारक असणे आवश्यक.

किती मिळते अनुदान?

  • पहिल्या वर्षी : अकुशल मजुरी 1 लाख 26 हजार 720 रुपये तर कुशल मजुरांसाठी 93 हजार 210 रुपये, असे एकूण 2 लाख 19 हजार 930 रुपये मिळतात.
  • दुसऱ्या वर्षी : मजुरीसाठी अकुशल स्वरूपात 51 हजार 200 रुपये. तर सामग्री, कुशल मजुरीपोटी 10 हजार 285 रुपये दिले जातात.
  • तिसऱ्या वर्षी : कुशल मजुरीसाठी 51 हजार 200 रुपये, कुशल मजूर आणि साहित्यासाठी 10 हजार 285 सरकारकडून दिले जातात.
error: Content is protected !!