शबरी घरकुल योजना GR : शासनाने उपलब्ध करून दिला नवीन अर्जाचा नमुना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शबरी घरकुल योजना GR : सन २०१३ पासून राज्यामध्ये शबरी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध होत नव्हता. तसेच अर्जाचा नमुना आणि एकदा नाकारला जायचा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा अर्ज चा नमुना दिला जात होता. वेगवेगळ्या जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार एक अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शबरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय आहे.

शबरी घरकुल योजनेच्या लाभासाठी पात्रता

1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
4. लाभार्थ्यांकडे स्वतःचे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :-
अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख
ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख
क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख

घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे –

अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख, नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख
ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख
क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
२) रहिवासी प्रमाणपत्र
३) जमातीचे प्रमाणपत्र
४) सातबारा उतारा किंवा ८-अ (घरकुल बांधकामासाठी जागा आहे की नाही यासाठी)
५) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
६) ग्रामसभेचा ठराव
७) शिधापत्रिका
८) आधार कार्ड
९) एक रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque)

error: Content is protected !!