Shaktiman Rotavator : रोटाव्हेटर घ्यायचाय? शक्तिमान कंपनीचा रोटाव्हेटर 1.60 लाख रुपयांमध्ये उपलब्ध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी विविध शेती अवजारांची (Shaktiman Rotavator) आवश्यकता असते. विशेष म्हणजे शेतीची सर्व कामे ही हल्ली ट्रॅक्टरच्या मदतीनेच केली जातात. त्यामुळे ट्रॅक्टरचलित अवजारांची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शक्तिमान कंपनीचा रोटाव्हेटर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शक्तिमान कंपनीच्या ‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’बद्दल (Shaktiman Rotavator) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’बद्दल (Shaktiman Rotavator For Farmers)

शक्तिमान कंपनीचा ‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’ (Shaktiman Rotavator) हा सर्व प्रकारच्या मातीमध्ये काम करण्यासाठी कार्यक्षम आहे. या रोटाव्हेटरसाठी शेतकऱ्यांकडे 35 से 60 हॉर्स पावर ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. शक्तिमान कंपनीच्या या रोटाव्हेटरमध्ये तुम्हाला कॅट-२ टाइर थ्री पॉइंट लिकेंज सिस्टिम पाहायला मिळते. ज्यामुळे रोटाव्हेटरची ट्रॅक्टरसोबत मजबूत पकड बसण्यास मदत होते. याशिवाय या रोटाव्हेटरला कंपनीने चैन टाइप ट्रांसमिशन दिले आहे. इतकेच नाही तर कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला खूप मजबूत पाती दिली आहेत. ज्यामुळे शेतीची मशागत करण्यास खूप मदत होते. कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला 1002 एमएम लांबी, 2680 / 2460 एमएम रुंदी आणि 1094 एमएम उंचीमध्ये तयार केले आहे. याशिवाय या रोटाव्हेटरचे वजन हे 320 ते 370 किलो इतके आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

शक्तिमान कंपनीचा ‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’ हा शेतीची मशागत करताना आधीच्या पिकांचे सर्व अवशेष सहजपणे नष्ट करतो. ज्यामुळे खूपच कमी कालावधीमध्ये जमीन तयार होऊन, शेतकऱ्यांना पेरणी करता येते. इतकेच नाही तर शक्तिमान रोटाव्हेटरच्या मदतीने ओल्या आणि कोरड्या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये काम करता येते. ज्यामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात शेत मशागतीची कामे होतात. हा रोटाव्हेटर शेतीमध्ये बांधाला गेल्यानंतर अगदी सहजपणे फिरवला जाऊ शकतो. ज्यामुळे ट्रॅक्टर गिअरबॉक्स देखील सुरक्षित राहण्यास मदत होते.

किती आहे किंमत?

शक्तिमान कंपनीचा ‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’ हा शेतकऱ्यांसाठी अगदी माफक किमतीत उपलब्ध असून, त्याची किंमत 1.60 लाख रुपये इतकी निर्धरित करण्यात आली आहे. या रोटाव्हेटरमुळे शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या मदतीने शेतीला करण्यास मदत होत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा टिकाऊ रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल तर शक्तिमान कंपनीचा ‘शक्तिमान धानमित्रम् रोटावेटर’ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

error: Content is protected !!