Shaktiman Rotavator : शेतकऱ्यांसाठी शक्तिमान कंपनीचा ‘शक्तिमान रोटाव्हेटर’; वाचा.. किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांकडे 4 ते 5 बैल जोडया (Shaktiman Rotavator) असायच्या. ज्याद्वारे शेतकरी पावसाळ्यात पेरणीपूर्वी शेतीची मशागत करायचे. मात्र आता सर्व कामे ट्रॅक्टरद्वारे होत असल्याने, कमी कालावधीत अधिक काम करणे सोपे झाले आहे. पेरणीपूर्वीची मशागत करताना आता ट्रॅक्टरद्वारे एकदा रोटाव्हेटर फिरवल्यास दिवसभरात खूप मोठ्या जमिनीची मशागत करणे शक्य होते. त्यामुळे आता तुम्ही देखील आपल्या ट्रॅक्टरसाठी एखादा रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल तर ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. आज आपण ‘शक्तिमान रोटाव्हेटर’बद्दल (Shaktiman Rotavator) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘शक्तिमान रोटाव्हेटर’बद्दल (Shaktiman Rotavator For Farmers)

‘शक्तिमान रोटाव्हेटर’ हा सर्व प्रकारच्या मातीमध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला 36, 42, 48, 54 और 60 ब्लेडमध्ये तयार केले आहे. या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला (Shaktiman Rotavator) 25 ते 65 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. शक्तिमान कंपनीचा हा रोटाव्हेटर गिअर ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला 1439/1652/1852/2052/2252 एमएम लांबी 838 एमएम रूंदीसह 1095 एमएम उंचीसह तयार करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या या रोटाव्हेटर एकूण वजन 339 ते 429 किलोग्रॅम इतके ठेवले आहे.

काय आहे खासियत?

‘शक्तिमान रोटाव्हेटर’च्या मदतीने तुम्ही शेतीमध्ये आधी घेतलेल्या पिकांचे अवशेष मुळांपासून मातीमध्ये बारीक करू शकतात. ज्यामुळे तुमचे वावर लवकर तयार होण्यास मदत होते. या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’चा वापर तुम्ही कोणत्याही पिकासाठी करू शकतात. याशिवाय तुम्ही कडक, ओली किंवा मग मुरमाड जमिनीमध्ये देखील या रोटाव्हेटरचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’च्या मदतीने तुम्ही थेट वावरात हाताने बियाणे फेकून, ते मातीमध्ये मिक्स करू शकतात. हा ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ शेतीमध्ये अगदी सहज पद्धतीने चालवता येतो. याशिवाय तो शेतीमध्ये काम करताना ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्सला सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.

किती आहे किंमत?

भारतामध्ये ‘शक्तिमान रोटाव्हेटर’च्या सर्व मॉडेलची किंमत वेगवेगळी असते. यामध्ये प्रामुख्याने एसआरटी – 4 1.25 रोटाव्हेटरची किंमत 97,281 रुपये, एसआरटी – 5 1.45 रोटाव्हेटरची किंमत 1.01 लाख रुपये, एसआरटी – 5.5 1.65 रोटाव्हेटरची किंमत 1.03 लाख रुपये, एसआरटी – 6 1.85 रोटाव्हेटची 1.06 लाख रुपये आणि एसआरटी – 7 2.05 रोटाव्हेटरची किंमत 1.11 लाख रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

error: Content is protected !!