Sharad Pawar : सरकारने द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान द्यावे; शरद पवार यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sharad Pawar : द्राक्ष उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत खूप काबाडकष्ट करावे लागते. कष्ट करून कुठे शेतकऱ्यांचे चांगले पिके येत. त्यामुळे त्यांचा जीवनमान सुधारायला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी भूमिका मांडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा वार्षिक चर्चासत्र आणि द्राक्ष परिषद MRDBS अंतर्गत आयोजित केलेल्या अधिवेशनात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केलीआहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पीक किती आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे त्या नोंदीमुळे अनेक कामांना मार्ग मोकळा होईल असे ते म्हणाले आहेत.

द्राक्ष पिकासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचा उदय

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कष्टाला आणि संघटनेला तोड नाही 1960 साली बारामतीत या संघटनेची स्थापना झाली असून अनेक लोक या संस्थेत काम करत आहेत. द्राक्ष संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेचा उदय झाला असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यांमधील अनेक ठिकाणाहून लोक एकत्र आले असून 35 हजाराहून अधिक शेतकरी या संघटनेचे सभासद असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

आमचे Hello Krushi ॲप डाऊनलोड केले का?

शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठीHello Krushi हे ॲप बनवले आहे. मात्र तुम्ही अजून हे इन्स्टॉल केले नसेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करा. आता तुम्ही म्हणाल याचा आम्हाला फायदा काय? तर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनाची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजचा हवामान अंदाज, रोजचे शेतमालाचे बाजार भाव, तुमच्या पशूंची खरेदी विक्री, इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत घेऊ शकता. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!