Sharad Pawar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात मोदी सरकारला अपयश – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी काहीही (Sharad Pawar) देणे-घेणे नाही. यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी त्यांना त्याच्या मालाला योग्य दर देखील मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. इतकेच नाही तर सत्तेतील सरकार सुडाचे राजकारण करत असून, निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांना अटक करण्याचे कारस्थान करत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. ते पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

उत्पन्न दुप्पट करण्यात अपयश (Sharad Pawar On Modi Government)

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जाहीर भाषणामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत म्हटले आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. मात्र सध्या याउलट परिस्थिती असून, देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाहीये. शेतकऱ्यांबाबत सरकारला कोणतीही फिकीर नाहीये. असेही शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.”

सरकारकडून सुडाचे राजकारण

यासोबतच केंद्रातील सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात असून, मागील काही दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून सरकार सातत्याने उत्तम काम करणाऱ्या नेत्यांवर चिखलफेक करत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळची लोकसभा निवडणूक ही वेगळी आहे. याची सरकारला प्रचिती आली आहे. त्यामुळे सरकारकडून सध्या सर्व मार्ग अवलंबले जात असून, राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले जात आहे. असेही शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी म्हटले आहे.

नेमकी सत्ता द्यायची कुणाकडे?

सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारची धोरणे पाहता, आपल्या सर्वासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाची आणि राज्याची सत्ता नेमकी द्यायची कुणाकडे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सत्तेचा वापर देशात संविधान आणले मात्र, सध्या त्याच संविधानावर गहाळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असेही शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात म्हटले आहे.

error: Content is protected !!