Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर.

मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                      

 नैसर्गिकपणे वाढणारे मित्र कीटक शत्रू कीटकांना शोधून मारतात                                                                   

पीक, मनुष्य, प्राणी किंवा पर्यावरणावर मित्र कीटकांचा विपरीत परिणाम होत                 

मित्र कीटकामुळे होणारे कीड नियंत्रण कायम स्वरुपाचे असते, त्यामुळे नुकसान कारक किडींचा उद्रेक होण्याची समस्या नसते.                                                      

मित्र कीटकाप्रति शत्रू कीटकात प्रतिकार क्षमता निर्माण होत नाही

जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक (Sheti Mitra Kitak)

अ) परोपजीवी कीटक: हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यामध्ये खालील किडींचा समावेश होतो.

1) ट्रायकोग्रामा: ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्र किडीची प्रजाती जैविक महत्त्वाचे कार्य करते.  या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो. या परोपजीवी कीटकाची चिलोनस ब्लॅकबर्नी ही प्रजाती परिणामकारक आहे.                                                       

 वापर: 50 हजार अळ्या प्रति हेक्टर. गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.

2) एनकार्शिया: हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच या मित्रकिडीचे (Sheti Mitra Kitak) प्रसारण करावे.

3) एपिरिकॅनिया: हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर जगतात. या मित्रकीटकांमुळे पायरिलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.          वापर: 50 हजार अंडी किंवा 5000 कोष प्रति हेक्टर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.

4) अपेंटॅलीस (कोटेशिया): भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी किंवा बोंड अळी) आदींच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा उपयोग होतो.                                                                    

वापर: 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर

5) ब्रेकॉन: कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो.                                               

वापर: 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर

6) कोपिडोसोमा: हे मित्रकीटक बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. 5000 अळ्या प्रति हेक्टर गरजेनुसार चार ते पाच वेळा प्रसारणे करावीत.

7) एनासियस: हे परोपजीवी कीटक सध्या जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे उदाहरण आहे. कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात उपद्रव करून नुकसान करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात या कीटकांचा मुख्य सहभाग होता.

ब) परभक्षी कीटक: हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.

1) लेडी बर्ड बीटल (ढाल किडे): बहुतेक पिकांवरील रस शोषक मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक (Sheti Mitra Kitak) मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. वापर: 2500 प्रति हेक्टर

2) ग्रीन लेस विंग/क्रायसोपर्ला (हिरवा जाळीदार पतंग): या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले किडी यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला वापर: 5000 अंडी प्रति हेक्टर किंवा 10 हजार अळ्या प्रति हेक्टर

3) प्रार्थना कीटक: हे मित्र कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.

4) डिफा (कोनोबाथ्रा) एफिडीव्होरा: हे मित्र कीटक (Sheti Mitra Kitak) जैविक नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहे. उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा जास्त मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा तीन ते पाच दिवसांत संपवते.

वापर: लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष प्रति गुंठा किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात.

5) परभक्षी कोळी (एम्ब्लीसियस): हे कीटक भाजीपाला, फुलझाडे व पॉलिहाऊसमधील पिकांवर नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

6) सिरफीड माशी: या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

मित्र किटकांचे संवर्धन कसे करावे? (How to Conserve Mitra Kitak)

  • रासायनिक कीटकनाशकाचा अति वापर टाळावा. खंड पद्धतीने कीटकनाशके फवारावीत. कमी हानीकारक व निवडक कीटकनाशके फवारावीत. जैविक कीटकनाशके वापरावीत.  
  • शेताच्या बांधावर भरपूर पराग कण असणारी फुलझाडे, सापळा पिके लावावीत, जेणेकरुन प्रौढ मित्र कीटकांना खाद्य मिळेल.
  • शेतातील पालापाचोळा जाळणे थांबवावे, मुंग्याचे नियंत्रण करावे कारण हे मित्र किडींसाठी (Sheti Mitra Kitak) हानिकारक आहे.
error: Content is protected !!