Shetkari Yashogatha: झेंडू शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या राजस्थानमधील तीन भावांची यशोगाथा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पारंपरिक शेतीतून (Shetkari Yashogatha) उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. फूल शेती (Flower Farming) हा असाच एक प्रयोग आहे. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये फुलांना सततच मागणी असते. त्यामुळे फुलांच्या शेतीमधून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. देशातल्या काही शेतकऱ्यांनी फूल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत (Shetkari Yashogatha).

राजस्थानातली डुंगरपूरमधल्या शेतकरी बंधुंची यशोगाथा (Shetkari Yashogatha) अशीच प्रेरक आहे. हे तीन बंधु झेंडूच्या फुलांची शेती (Marigold Farming) करून वर्षाला 6-7 लाख रुपये कमावतात.

डुंगरपूरच्या सुरपूर ग्रामपंचायतीतल्या धुवाडिया गावात कोदर पटेल, कचरू पटेल आणि तेजपाल पटेल हे तीन भाऊ झेंडूची शेती करून लाखो रुपये कमावत आहेत. झेंडूच्या शेतीमुळे आणि यात त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नामुळे हे तीनही भाऊ (Shetkari Yashogatha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

पूर्वी हे तीनही भाऊ पूर्वी गहू, तांदूळ, मका या पिकांची पारंपरिक शेती (Traditional Farming) करत होते. परंतु यातून मिळणारे उत्पन्न फार कमी असल्याने या भावांनी कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले, आणि सुरू झाला त्यांचा झेंडू लागवडीचा प्रवास.

फुलांची शेती करावी असा विचार त्यांच्या डोक्यात आला. कुटुंबियांनीही त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी फुलांची शेती करायला सुरुवात केली व आज त्यातून चांगला नफा कमावत आहेत (Farmers Success Story).

तिन्ही भाऊ हंगामानुसार फुलांची शेती करतात. त्यांच्याकडे असलेल्या अंदाजे 3 एकर जमिनीत त्यांनी तिघांची 3 शेतं तयार केली आहेत. एका शेतातून 2 दिवसांत 100 फुलांचं उत्पादन मिळतं. स्थानिक व्यापारी शेतातूनच 20-30 रुपये किलो अशा दराने फूलं घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वर्षाला 6 ते 7 लाख रूपयांचं उत्पन्न मिळत. झेंडूच्या फुलांची मागणी आपल्याकडे शक्यतो दसरा-दिवाळीच्या (Festivals) सुमारास असते; मात्र एरव्हीही झेंडूची फुलं सजावट व इतर उत्सवासाठी लागतात. त्यामुळेच या फुलांना मागणीही बऱ्यापैकी असते. हे लक्षात आल्यावर त्यांनी झेंडूच्या शेतीवरच लक्ष केंद्रित केले. एरवी ही फुले इतर फुलांच्या मानाने स्वस्त असल्यामुळे सामान्य लोकही या फुलांना सजावटीसाठी प्राधान्य देतात.   बाजारातील मागणी, किमतीचा ताळमेळ, आणि योग्य व्यवस्थापन करून या भावांनी मिळवलेले यश (Shetkari Yashogatha) कौतुकास्पद आहे.  

error: Content is protected !!