Shetkari Yashogatha: दूध व्यवसायातून एक कोटीचा बंगला बांधणारा शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज आपण महाराष्ट्रातील सोलापूर (Shetkari Yashogatha) जिल्ह्यातील एका अशा दूध उत्पादक शेतकरीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी गायीचे दूध विक्रीतून चक्क कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. व दूध व्यवसाय कसा फायदेशीर करायचा याचे उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर घालून दिलेले आहे. या प्रेरणादायी (Shetkari Yashogatha)शेतकऱ्याचे नाव आहे प्रकाश इमडे.

प्रकाश इमडे यांना चार एकर वडिलोपार्जित जमीन वारसाहक्काने मिळाली. परंतु ही जमीन कोरडवाहू असल्याने शेती करणे तेवढे फायदेशीर नाही हे त्यांच्या लक्षात आले.  त्यामुळे शेतीचा नाद सोडून 1998 मध्ये गाईचे दूध आणि शेण विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरुवातीला ते गावातील लोकांनाच दूध विकायचे. एका गायीपासून सुरू झालेला प्रकाश इमडे यांचा व्यवसाय आज 150 हून अधिक गायींच्या डेअरी फार्म एवढा आहे. फार्म सध्या दिवसाला 1,000 लिटर दुधाचे उत्पादन करते. इमडेचे संपूर्ण कुटुंब व्यवसायात प्रत्येक त्यांना टप्प्यावर मदत करते. गायींचे दूध काढणे, त्यांना चारा देणे आणि त्यांची देखभाल करणे हे सगळे काम कुटुंब एकत्र करतात.

विशेष म्हणजे प्रकाश इमडे यांनी त्यांच्या गायींचे एकही वासरू विकले नाही. त्यामुळे आजही त्यांच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. 2006 मध्ये त्यांची पहिली गाय लक्ष्मीच्या मृत्यूनंतर, त्यांनी त्यांची वंशावळ वाढवणे सुरूच ठेवले आणि गुरांच्या त्याच वंशातून शेती चालविली.

गायींना दररोज चार ते पाच टन हिरवा चारा लागतो. ते शेतात शक्य तितक्या हिरव्या चाऱ्याची लागवड करतात, आणि उर्वरित बाहेरून खरेदी करतात.

इमदे यांनी स्वत:ला एक चांगला उद्योजक म्हणून सिद्ध केले आहे.  त्यांच्या दूध व्यवसायामुळे गावातील लोकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतात. प्रकाश इमडे यांचे डेयरी फार्म पाहण्यासाठी, शिकण्यासाठी इतर राज्यातूनही लोक सांगोल्यात येतात. ते स्वत: सुद्धा इतरांच्या शेताचे दौरे करतात.

प्रकाश यांच्या वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नामुळे आणि कष्टाच्या बळावर त्यांनी एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे (Shetkari Yashogatha). हे सगळे यश दूध व्यवसायातून मिळवले असल्यामुळे कृतज्ञता म्हणून त्यांनी त्यांच्या बंगल्यावर गायीची आणि दुधाच्या केटलीची प्रतिमा घरावर उभारली आहे. त्यांनी त्यांच्या बंगल्याचे नाव सुद्धा ‘गोधन निवास’ असे ठेवले आहे. प्रकाश इमडे यांना स्थानिक लोक प्रेमाने बापू म्हणतात.  आजही त्यांची पहिली गाय लक्ष्मीच्या फोटोला नमस्कार करून दिवसाच्या कामाची सुरुवात करतात. गोधन हे शेतकऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचे प्राणी आहेत. त्यांच्या स्मरण शेतकऱ्यांनी नेहमीच करायला हवे हेच त्यांच्या कृतीतून दिसते (Shetkari Yashogatha).

error: Content is protected !!