Shettale Subsidy : शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करा, सरकारचे आवाहन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अर्थात ‘मागेल त्याला शेततळे योजना’ (Shettale Subsidy) राज्य सरकारकडून राबवली जाते. या योजनेसाठी 2023-24 मध्ये एकूण 80 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी शेततळे अनुदानासाठी (Shettale Subsidy) अधिकाधिक अर्ज करावेत. असे आवाहन राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

काय आहे ‘ही’ योजना (Shettale Subsidy For Farmers)

शेती करताना पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पावसाळा संपल्यानंतर काही भागांमध्ये खूपच लवकरच पाणीपातळी खालावते. ज्यामुळे शेतकऱ्यांना एक खात्रीशीर पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा. यासाठी राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला शेततळे योजना’ (Shettale Subsidy) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या जमिनीमध्ये शेततळे खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय शेततळ्याच्या कागदासाठी (ताडपत्री) अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊन, शाश्वत पिके घेण्यास मदत होते. विशेष म्हणजे फळ पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा खूप फायदा झाला आहे.

किती मिळते अनुदान?

वैयक्तिक शेततळे अर्थात मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्याच्या खोदाईसाठी एकूण 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान (Shettale Subsidy) राज्य सरकारकडून दिले जाते. तर शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला अतिरिक्त 75 हजार रुपयांपर्यंत वेगळे अनुदान दिले जाते. अर्थात शेतकऱ्यांना एकत्रितपणे 1.50 लाखांपर्यंत अनुदान मिळते. दरम्यान, आतापर्यंत या योजनेअंतर्गत 7 हजार 316 शेततळ्यांकरिता शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच 1 हजार 665 शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु आहे. असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कुठे कराल अर्ज?

  • राज्य सरकारच्या महा डीबीटी पोर्टलवरुन या योजनेची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाते.
  • याशिवाय तुम्ही आपल्या तालुक्याच्या कृषी विभागात कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी या योजनेबाबत संपर्क करू शकतात.
  • संबंधित अधिकाऱ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकतात.
  • यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून मागेल त्याला शेत तळे योजनेचा नोंदणी फॉर्म घ्या. या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर तुमच्या अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडा. आणि तुमचा अर्ज कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करा.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधारसोबत लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • जमिनीची कागदपत्रे ७/१२, ८-अ
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 1800-120-8040

error: Content is protected !!