Shevga Lagwad : शेवग्याच्या ‘या’ वाणाची लागवड करा; वर्षभर मिळेल भरघोस उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत, फळ पिकांच्या किंवा मग भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे (Shevga Lagwad) शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे फळे आणि भाजीपाला पिकांना बाजारात वर्षभर मागणी असते. ज्यामुळे त्यातुन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई देखील होते. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील बरेच शेतकरी सध्या शेवगा लागवड करताना दिसून येत आहेत. शेवगा शेती ही फायद्याची शेती मानली जाते. कारण शेवग्याच्या झाडापासून प्रामुख्याने फळ, पाने, मुळे यांसारख्या सर्वच बाबींना मागणी असते. त्यामुळे नव्याने शेवगा लागवडीबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा असणारे अनेक शेतकरी असतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेवग्याच्या एका विशेष प्रजातीबाबत (Shevga Lagwad) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मिळते भरघोस उत्पादन (Shevga Lagwad PKM-1 Variety)

शेवग्याच्या या विशेष प्रजातीचे (Shevga Lagwad) नाव ‘पीकेएम-1’ असे आहे. शेवग्याच्या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती बारा महिन्यातून दोन वेळा फळ देते. विशेष म्हणजे शेवग्याच्या या जातीच्या एका झाडापासून शेतकऱ्यांना वर्षभर 30 किलोपर्यंत अर्थात 650 ते 850 शेंगा मिळतात. बाजारात प्रामुख्याने शेवग्याला 80 से 100 रुपये प्रति किलोचा दर हमखास मिळतो. तर घाऊक बाजारात शेवग्याचा दर हा 50 ते 60 रुपये प्रति किलोच्या खाली कधीच नसतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना या वाणाच्या माध्यमातून मोठी आर्थिक कमाई करता येते.

‘पीकेएम-1’ वाणाची वैशिष्ट्ये

  • हे वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पेरियाकुलम् फळबाग संशोधन केंद्राने विकसित केले आहे.
  • लागवडीनंतर केवळ सहा महिन्यात या वाणाला शेंगा येतात.
  • एका शेंगेची लांबी ही साधारपणे 40 ते 45 सेंटिमीटर इतकी असते.
  • विशेष म्हणजे हे वाण महाराष्ट्रातील वातावरणात वर्षातून दोन वेळा भरघोस शेंगा देते.
  • या वाणाच्या शेंगा या वजनदार, चविष्ट असतात. मात्र या वाणाचे शेंगेचे ‘बी’ फारसे मोठे नसते.
  • ‘पीकेएम-1’ या वाणाची झाडे साडेचार ते पाच मीटर उंच वाढतात.
  • या वाणाच्या मदतीने मिळून शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात मिळून एका झाडापासून 650 ते 850 शेंगा मिळतात.
error: Content is protected !!