Shimla Mirchi Rate : शिमला मिरचीचे दर तेजीत, वांगी दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या सुरुवातीला दबावात असलेले शिमला मिरचीचे दर (Shimla Mirchi Rate) सध्या तेजीत असलेले पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बाजार समितीत आज शिमला मिरचीची 61 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी सर्वाधिक कमाल 8000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी नाशिक बाजार समितीत शिमला मिरचीला मिळालेला 9190 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर (Shimla Mirchi Rate) आज 7500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे.

आजचे शिमला मिरचीचे दर (Shimla Mirchi Rate In Maharashtra)

आज मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिमला मिरचीची सर्वाधिक 1301 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5200 ते किमान 3400 रुपये तर सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. पुणे येथील बाजार समितीमध्ये आज शिमला मिरचीची 390 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6000 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, पुणे जिल्ह्यातील खेड चाकण बाजार समितीमध्ये आज शिमला मिरचीची 130 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल, रत्नागिरी बाजार समितीमध्ये आज शिमला मिरचीची 18 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7000 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

वांगी दरात घसरण

शिमला मिरचीच्या दरात (Shimla Mirchi Rate) तेजी पाहायला मिळत असली तरी आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांग्याच्या दरात घसरण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मागील आठवडाभर वांगी दरात असलेली तेजी आता काहीशी कमी झाली आहे. आज जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत 22 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 9600 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज 35 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 8000 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, अकलुज बाजार समितीत 12 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6500 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

धाराशिव बाजार समितीत 10 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 8000 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, नगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीत 6 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6700 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोशी बाजार समितीत 46 क्विंटल वांग्याची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7000 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!