Shimla Mirchi Rate : शिमला मिरचीच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात शिमला मिरचीचे दर (Shimla Mirchi Rate) काहीसे वाढले होते. मात्र आता त्यात पुन्हा घसरण झाली असून, आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीला सरासरी 4500 ते 6000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मागील आठवड्यात नाशिक येथील बाजार समितीत शिमला मिरचीला सर्वाधिक कमाल 6875 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यात आज घसरण होऊन नाशिक बाजार समितीत शिमला मिरचीला कमाल 6250 रुपये प्रति क्विंटल दर (Shimla Mirchi Rate) मिळाला आहे.

आजचे शिमला मिरचीचे भाव (Shimla Mirchi Rate Today 2 Jan 2024)

नाशिक बाजार समितीत आज शिमला मिरचीची 67 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6250 ते किमान 3750 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर (Shimla Mirchi Rate) मिळाला आहे, पुणे जिल्ह्यातील खेड-चाकण येथील बाजार समितीत मागील आठवड्याभरापासून कमाल 7000 रुपये प्रति क्विंटल हा दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहे. खेड-चाकण येथील बाजार समितीत आज 150 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल, सातारा बाजार समितीत आज शिमला मिरचीची 11 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीत आज शिमला मिरचीची 14 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 6000 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील मोशी बाजार समितीत आज शिमला मिरचीची 18 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत (Shimla Mirchi Rate) आज शिमला मिरचीची 814 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 3500 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज शिमला मिरचीची 270 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5000 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज शिमला मिरचीची 12 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 3500 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज शिमला मिरचीची 27 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 3200 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 2850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आवक पुन्हा पूर्व पदावर

दरम्यान, सध्या राज्यातील अनेक भागांमधून बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीची आवक होत आहे. त्यामुळे दरात काहीशी घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील आठवड्यात घटलेली आवक, या आठवड्यात पुन्हा पूर्वपदावर आल्याने राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या शिमला मिरचीचे दर काहीसे उतरणीला लागले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!