हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शिमला मिरचीची (Shimla Mirchi) मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. विशेष म्हणजे शिमला मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहे. तुम्हीही शिमला मिरचीची लागवड करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शिमला मिरचीची (Shimla Mirchi) योग्य प्रजाती निवडून तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता.
शिमला मिरचीच्या (Shimla Mirchi) बाजारात वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. मात्र तुम्ही प्रमुख चार प्रजातींची निवड करून, शिमला मिरचीची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवू शकतात. शिमला मिरचीला बाजारात वर्षभर मागणी असते. तसेच तिला दरही चांगला मिळतो. कॅलिफोर्निया वंडर, अर्का मोहिनी आणि ओरोबेल या शिमला मिरचीच्या काही प्रजाती आहेत. मात्र तुम्ही इंद्र, सोलन हायब्रिड 2, कॅलिफोर्निया वंडर आणि ओरोबेल या वाणांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात.
‘या’ आहेत 4 सर्वोत्तम प्रजाती (Shimla Mirchi Main 4 Species)
- इंद्र प्रजाती
- 70 ते 75 दिवसात शिमला मिरची तोडणीला येते.
- एकरी 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
- इंद्र जातीच्या एका मिरचीचे वजन 100 ते 150 ग्रॅम असते.
- सोलन हायब्रिड 2 प्रजाती
- शिमला मिरचीची ही प्रजाती भरघोस उत्पादनासाठी ओळखली जाते.
- सोलन हायब्रिड 2 प्रजाती ही शिमला मिरचीची एक संकरित प्रजाती आहे.
- ही प्रजाती लागवड केल्यानंतर 60 ते 70 दिवसांत तोडणीला येते.
- या प्रजातींच्या माध्यमातून एकरी 135 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.
- कॅलिफोर्निया वंडर
- शिमला मिरचीची ही प्रजाती लागवडीनंतर 70 दिवसांमध्ये काढणीला येते.
- या प्रजातीच्या माध्यमातून एकरी 125 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.
- कॅलिफोर्निया वंडर ही शिमला मिरचीची विदेशी प्रजाती आहे.
- ओरोबेल प्रजाती
- थंड हवामानातील प्रदेशासाठी शिमला मिरचीचे ही प्रजाती विकसित करण्यात आली आहे.
- या प्रजातीची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे यावर जास्त किडींचा प्रादुर्भाव होत नाही.
- शिमला मिरचीची ही प्रजाती प्रामुख्याने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे.
- उत्तरप्रदेश, बिहार राज्यांसाठी देखील या प्रजातीची शिफारस करण्यात आली आहे.
- या शिमला मिरचीच्या प्रजातीचा रंग पिवळा असतो.
- या प्रजातीची लागवड प्रामुख्याने पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते.