Viral Video : सध्या बाजारामध्ये टोमॅटोच्या (Tomato Rate) भावाने 150 रुपये किलोचा आकडा पार केला आहे. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोसाठी ग्राहकांची दुकानदारांशी भांडणे सुरू असल्याची परिस्थिती आहे. भांडणाचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ भांडणाचा नसून एका वेगळ्याच कारणाचा आहे.
रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
वाराणसीमध्ये एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साठ्याच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. सध्या याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. वाराणसीमधील लंका भागातील हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Latest Marathi News)
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत असल्यामुळे
बाऊन्सर तैनात करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.