Sweet Corn Farming : स्वीट कॉर्नची शेती करून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपयांचा नफा, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sweet Corn Farming : पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण फिरण्यासाठी बाहेर कुठेतरी जातात. यानंतर मनात कणीस खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळेच पावसाच्या सिजनमध्ये बाजारात मक्याची मागणी देखील वाढते आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. भुट्टा, ज्याला इंग्रजीत स्वीट कॉर्न असेही म्हणतात, अनेक प्रकारे खाल्ले जाते. काही लोक ते उकळून खातात, तर काहीजण भाजून खातात. तर काहींना त्याचे सूप प्यायला देखील आवडते. ज्यावेळी ते सुकते तेव्हा लोक पॉपकॉर्न बनवतात आणि ते आनंदाने खातात. आतापर्यंत तुम्ही फक्त स्वीट कॉर्न खाल्ले असेल, मात्र त्याची लागवड कशी करावी हे तुम्हाला माहिती आहे का? आज याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

स्वीट कॉर्न ही मक्याची एक अतिशय गोड जात आहे, जेव्हा मक्याचे पीक पक्व होण्यापूर्वीच दुधाळ स्थितीत कापणी केली जाते तेव्हा त्याला स्वीट कॉर्न म्हणतात. अनेक ठिकाणी स्वीट कॉर्नला खूप पसंती दिली जाते. स्वीट कॉर्नला मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे स्वीट कॉर्नची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. (Sweet Corn Farming)

त्याची लागवड नेमकी कशी केली जाते?

आपण जशी मक्याची लागवड करतो अगदी तशीच स्वीट कॉर्नची लागवड केली जाते. मात्र, स्वीट कॉर्नची लागवड करण्यासाठी कमी वेळेत पक्व होणाऱ्या कीटक प्रतिरोधक जाती निवडणे उत्तम. त्यामुळे कमी दिवसातच चांगला नफा मिळतो. स्वीट कॉर्न हे संपूर्ण भारतात घेतले जात असले तरी उत्तर प्रदेशात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उत्तर भारतात जून ते जुलै दरम्यान याची पेरणी केली जाते. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात तुम्ही स्वीट कॉर्नची लागवड करू शकता.

या अँप मध्ये मिळेल शेतीविषयक सर्व माहिती

शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी एक अँप बनविले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, पीक व्यवस्थापन, सातबारा व भू-नकाशा याबाबत सर्व माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!