Sirohi Goat: 4 ते 40 डिग्री तापमान सहन करणारी ‘सिरोही शेळी’, बोकडांनाही असते ईद मध्ये प्रचंड मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध आणि मांस उत्पादन या दोन्ही उद्देशासाठी वापरली जाणारी सिरोही (Sirohi Goat) शेळीत फारच वेगळे गुणधर्म आहे. सिरोही शेळी धिटपणा आणि रोग प्रतिकार शक्तीसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे त्यांची देखभाल तुलनेने कमी आणि काळजी घेणे सोपे होते. जाणून घेऊ या शेळीबद्दल (Sirohi Goat) सविस्तर माहिती.

उगम

ही शेळी (Sirohi Goat) मुळची राजस्थान (Rajasthan) मधील सिरोही जिल्ह्यातली आहे. प्रामुख्याने राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेच्या आसपासच्या भागात आढळते. याशिवाय गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये सुद्धा या शेळ्या आढळतात. तसेच कर्नाटक आणि केरळ राज्यातही सिरोही जातीच्या शेळीचे पालन (Goat Farming) केले जाते.

शारीरिक ठेवण

या शेळ्यांच्या शरीरावर तपकिरी, काळे आणि पांढरे रंगाचे ठिपके असतात. तर, काही ठिकाणी या शेळ्या पूर्णपणे एकाच रंगात आढळतात. ही शेळी मध्यम व दंड गोलाकार आकाराची असते. अंगावर एकदम दाट केस असतात. शेळीचे कान मध्यम आकाराचे आणि तळाशी पानांच्या आकाराचे असतात. या शेळीचे शिंगे भक्कम असतात व ती मागच्या बाजूला वळलेली असतात. मादीचे वजन हे 45 ते 50 किलोपर्यंत असते तर बोकडाचे वजन अंदाजे 60 ते 65 किलो असते.

प्रजनन आणि दूध उत्पादन (Milk Production)

सिरोही शेळी 1.5 वर्षात दोन वेळा वेत देते. शेळ्यांमध्ये 1 पिल्लू देण्याचे प्रमाण 40%, 2 पिल्लू देण्याचे प्रमाण 50%, 3 पिल्लू देण्याचे प्रमाण 10% आहे. या शेळ्या 14 ते 16 महिन्यांत करडांना जन्म देऊ लागतात. संपूर्ण आयुष्यात 10-12 करडू देण्याची क्षमता सिरोही शेळीमध्ये असते.

या शेळीची (Sirohi Goat) प्रतिदिन दूध देण्याची क्षमता 0.5 ते 1.5 लिटर इतकी असते.

इतर वैशिष्ट्ये

सिरोही शेळी (Sirohi Goat) जास्तीत जास्त 40+ उष्ण वातावरण तसेच कमीत कमी 4 ते 5 डिग्री पर्यंत थंडी सहन करू शकते. बोकडांच्या शारीरिक रचनेमुळे व त्यांच्या रंगामधील विविधतेमुळे सिरोही बोकडांना ईद मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या शेळ्यांना दिवसातून पाच ते सहा किलो चारा (Goat Fodder) लागतो तर यामध्ये 70 टक्के हा हिरवा चारा तर 30 टक्के सुका चारा दिला जातो.

error: Content is protected !!