Sitaphal Rate : सध्या शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. टोमॅटो, आले, कोथिंबीर या भाज्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आता या पाठोपाठ बाजारामध्ये सीताफळ देखील सुरू झाले असुन सीताफळाला चांगला दर मिळत आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
आपल्याकडे बरेच शेतकरी सीताफळाचे उत्पादन घेत आहेत. सध्या मार्केटयार्ड बाजारामध्ये सिताफळाची आवक सूरू असून, यंदा सीताफळाला किलोला प्रतवारी नूसार २० ते १८० भाव मिळत आहे. यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जर पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा देखील होतो. त्यामुळे सध्याचे सीताफळाचे दर पाहता शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. (Sitaphal Rate : )
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजची ताजे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आजच Hello krushi हे ॲप इंस्टॉल करा यामध्ये तुम्हाला दररोजचे ताजे बाजार भाव जाणून घेता येतील त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ॲप मध्ये अगदी मोफत वाचता येईल त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा.
पुणे जिल्ह्यामधुन वडकी, नगर, इंदापूर, पुरंदर, शिरूर,सासवड या भागात आवक सूरू असून मार्केटयार्ड बाजारात दिवसाला ४ ते ५ टन आवक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सिताफळाचा हंगाम जुलै ते नोव्हेबर पर्यंत असतो. यावर्षी पावसामुळे सिताफळांचे उत्पादन कमी त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.
शेतमाल : सिताफळ (Sitaphal Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/07/2023 | ||||||
मुंबई – फ्रुट मार्केट | — | क्विंटल | 519 | 6000 | 7000 | 6500 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 3 | 1000 | 6000 | 4500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 3 | 5000 | 5000 | 5000 |
17/07/2023 | ||||||
पुणे-मांजरी | — | क्विंटल | 3 | 3000 | 4500 | 3750 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 8 | 1000 | 5000 | 3500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 14 | 500 | 1000 | 750 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 5 | 5000 | 5000 | 5000 |