गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; इतकं अनुदान मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा अल निनो या कारणाने राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. अशातच राज्यातील धरण तसेच शिवारात ४४ कोटीपर्यंत घनमीटर गाळ आहे. राज्यात गळयुक्त शिवार योजनेतून यंत्रसामग्रीसह इंधनावरील खर्च ३१ रुपये देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी एका एकरासाठी १५ हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे.

ही योजना मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात राबवली जाते. यापूर्वीच्या योजनेत फक्त शेतकऱ्यांना इंधन खर्च देण्यात येत होता. तसेच मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरवण्याचा खर्च हा स्वतः शेतकरी करायचे. ६०० हेक्टरहून कमी लाभक्षेत्र असलेल्या आणि १० वर्षांपेक्षा जुन्या जलसाठ्यांना योजनेत प्राधान्य राहील. गाळ उपसण्यासाठी परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच या योजनेची काही वैशिष्ठे आहेत ती खालील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

योजनेचा असा मिळवू शकता लाभ

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर एक काम करावं लागेल. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi डाउनलोड करा. हॅलो कृषी अँप ओपन करताच तुम्हाला कृषी योजना हा विभाग दिसेल. यामध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजना दिसतील. त्यानंतर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ उठवू शकता. यासाठी तुम्हाला १ रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही हे विशेष.. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

गाळयुक्त शिवार योजनेची थोडक्यात वैशिष्टे

१) गाळ घेऊन गेलेले अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना १ ते २ हेक्टर शेतकऱ्यांची यादी करून दिली जाईल.

२) काही शेतकरी बहुभूधारक असेल तरीही अपघातग्रस्त, विधवा, अपंग व्यक्ती कुटुंब अनुदानास पात्र राहतील.

३) ४०० घनमीटर गाळासाठी ३७ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीचा ठराव हा जिल्हाधिकारी समितीस सादर करावा लागणार

४) जलसाठ्यातील उपलब्ध गाळाचा अंदाजे उल्लेख करावा लागणार आहे. हे एक या योजनेचे वैशिष्ट आहे.

error: Content is protected !!