Snake Farming : भारत हा कृषिप्रधान देश असून या देशांमध्ये लोक अन्नधान्य, फळ, भाजीपाला त्याचबरोबर पशुपालन व्यवसाय असे अनेक व्यवसाय करतात. मात्र आम्ही जर तुम्हाला म्हटलं की सापाची शेती करा तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्ही तर म्हणाल आपल्याकडे लोक साप पाळत नाही तर त्याला मारून टाकतात. मात्र असा एक देश आहे ज्या ठिकाणी सापाची शेती केली जाते आणि या शेतीमधून लोक देखील चांगला पैसा कमवत आहेत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
सापाची शेती करणारा देश कोणता?
सापाची शेती करणारा देश दुसरा तिसरा कोणता नसून चीन हा आहे. चीनच्या जीसीकियाओ गावांमध्ये लोक सापाची शेती करतात आणि त्यामधून चांगली कमाई देखील करत आहेत. या गावाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा सापपालन आहे. त्यामुळे या गावाला स्नेक व्हिलेज असे देखील म्हटले जाते. या ठिकाणचे सर्वजण सापांची शेती करतात. या गावाच्या लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे 1000 ही त्या गावची लोकसंख्या आहे. या ठिकाणी राहणारा प्रत्येक व्यक्ती सुमारे 30 हजार सापांचे पालन करतो. यावरून आपल्या लक्षातच येते की त्यांची किती रुपयांची उलाढाल होत असेल.
सापाच्या मांसाचा खूप मोठा फायदा
या ठिकाणची मुलं खेळणं खेळण्याऐवजी सापाशी जास्त खेळतात. त्याचबरोबर सापाच्या मासांपासून देखील इथल्या लोकांना चांगला फायदा मिळतो. सापांचे मास विक्री करून लोक करोडो रुपये कमवत आहेत. सापाचे विष सोन्यापेक्षा जास्त महाग आहे त्याचबरोबर त्याला मागणी देखील मोठी आहे त्यामुळे या लोकांना यामधून चांगले उत्पन्न मिळते. जर सर्वात जास्त विषारी सापाचे एक लिटर विष घ्यायचे असेल तर त्यासाठी तीन कोटी रुपये मोजावे लागतात.
त्याचबरोबर तुम्हाला तर माहिती आहे चीन हा असा देश आहे जे सर्व किडे खातात. यामध्ये सापाचे मांस देखील खाल्ले जाते. ज्यामधून लोक चांगली कमाई करत आहेत. आपण भारतामध्ये पनीर खातो तसेच चीनमध्ये साप खातात या सापांना लाकडाच्या किंवा काचेच्या बॉक्समध्ये पाळले जाते. त्याचबरोबर या सापाच्या चंबड्या पासूनअनेक वस्तू बनवल्या जातात.
भारतात मात्र तुम्ही या गोष्टी करू शकत नाही
शेतकरी मित्रांनो जगात कोणकोणत्या प्रकारे लोक वेगळा विचार करून शेती करतात याची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. यातून आपणही आपल्या आजूबाजूचे मार्केट, लोकांच्या गरजा पाहून शेतीला व्यावसायिक नजरेतून पाहणे गरजेचे आहे. सापाची शेती भारतात तुम्ही करण्याचा विचार करू शकत नाही. कारण आपल्याकडे याला कायद्यात गुन्हा समजले जाऊ शकते. तसेच चीन प्रमाणे आपल्याकडे सापाला मागणीही नाही. परंतु तुम्ही बदक, इगू, कोंबड्या, उंट, गाढव, गाई, म्हैस असे प्राणी पळून चांगला नफा कमवू शकता.