Soil Health Card : शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी शासन अनेक योजना राबवून त्यांना मदत करते. मृदा आरोग्य कार्ड योजना ही देखील अशीच योजना आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांची माती परीक्षण करून अहवालाच्या आधारे शेती केली जाते. असे केल्याने त्यांचा शेतीवरील खर्चही कमी होतो आणि उत्पादनातही पूर्वीच्या तुलनेत वाढ होते. कारण आपल्या मातीची चाचणी केल्यावर जमिनीत काय कमतरता आहे आणि ती कशी दुरुस्त करायची हे कळते. यासोबतच या जमिनीत कोणते पीक चांगले येईल हेही कळते. आज आपण शासनाच्या या योजनेला अर्ज कसा करायचा याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
जमिनीची उत्पादकता कमी झालीय?
शेतामधून अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर मागील काही वर्षात केला गेला. यामुळे मुबलक उत्पादन निघाले हे खरे आहे परंतु त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढून आता त्या जमिनीतून काहीच उत्पादन निघत नसल्याचं अनेक शेतकरी सांगतात. खतांचा गरजेपेक्षा अधिक वापर केल्याने जमीन नापीक होणं अलीकडच्या काळात वाढत आहे. तुमच्याही जमिनीची उत्पादकता अशाप्रकारे कमी झालीय का? किंवा तुमची जमीन नापीक होऊ नये असं तुम्हाला वाटतअसेल तर मृदा आरोग्य कार्ड योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे.
जमिनीचे आरोग्य का तपासायला हवं?
शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीतून चांगले उत्पादन काढण्यासाठी जमिनीचे आरोग्य चांगले असणे खूप गरजेचे आहे. अलीकडे ज्या जमिनीतून १०-१२ क्विंटल कापूस निघायचा तिथे आता ७-८ क्विंटल कापूस निघतो आहे. याला कारण आहे अतिप्रमाणात रासायनिक खतांचा केलेला वापर. म्हणूनच आता वेळ आलीय जमिनीचे आरोग्य तपासून तिला ज्याची गरज आहे तितकेच खत देण्याची.
तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच करा बसल्याबसल्या हे काम
हे कार्ड बनवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Hello Krushi मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. यासाठी तुम्हाला मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करून अँप डाउनलोड करावे लागेल. यानंतर मोबाईल नंबर, नाव आदी माहिती भरून मोफत रजिस्टर केल्यांनतर सरकारी योजना विभागात जाऊन तुम्ही Soil Health Card साठी अर्ज करू शकता.
हे कार्ड बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा
१) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर Hello Krushi हे अँप डाउनलोड करून घ्या.
२) आता हॅलो कृषी अँपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सरकारी योजना विभागात जा.
३) आता इथे तुम्हाला शासनाच्या सर्व योजनांची लिस्ट दिसेल. यामध्ये मृदा आरोग्य कार्ड योजनेवर क्लिक करा.
४) आता स्क्रीनवर तुम्हाला Soil Health Card बाबत सविस्तर माहिती दिसेल. यामध्ये शेवटी Apply Now असे बटन आहे. त्यावर क्लिक करा.
५) आता तुम्हाला Soil Health Card Online Registration साठी पेज ओपन होईल.
६) होम पेजवर मागितलेली माहिती भरून, लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.
७) यानंतर राज्य निवडा, म्हणजे आपले राज्य आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
८) प्रथमच अर्ज करत असल्यास, खाली Register New User वर क्लिक करा आणि नोंदणी फॉर्म भरा. तुम्हाला या नोंदणी फॉर्ममध्ये वापरकर्ता संस्था तपशील, भाषा, वापरकर्ता तपशील, वापरकर्ता लॉगिन खाते तपशील यांची माहिती भरावी लागेल.
यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा. हे केल्यानंतर, तुम्ही लॉग इन करून माती परीक्षणासाठी अर्ज करू शकता.
Soil Health Card नेमकं काय आहे?
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण करून गरजेनुसार खते देणे हि काळाची गरज आहे. यासाठी त्या जमिनीच्या आरोग्याची म्हणजेच मातीचे परीक्षण करणे गरजेचे बनले आहे. शेतकऱ्यांची हि गरज लक्षात घेऊन सरकारने याकरता मृदा आरोग्य कार्ड योजना सुरु केली आहे. आपण या योजनेला अर्ज केल्यानंतर शासनाच्या सेवेचा लाभ आपल्याला मिळतो. आपल्या जमिनीत कोणते घटक जास्त अन कोणते घटक कमी आहेत याबाबत माहिती आपल्याला मिळते.
नेमके या कार्डचे फायदे काय आहेत?
मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत, कोणताही भारतीय शेतकरी माती परीक्षण करू शकतो. या कार्डाच्या मदतीने शेतकऱ्यांना जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे, किती पाणी वापरावे आणि कोणती पिके घेतल्यास त्याचा फायदा होईल हे कळू शकते. कार्ड बनवल्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, उत्पादन क्षमता, जमिनीतील आर्द्रता, दर्जा आणि जमिनीतील कमकुवतपणा सुधारण्याचे मार्ग सांगितले जातात.