Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे.

केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून शेतकर्‍यांसाठी मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) योजना सुरू केली होती. मृदा आरोग्य कार्ड योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शिफारशीत खतांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे, व प्रति यूनिट खर्च कमी करून जास्त उत्पादन मिळविणे हा आहे.

सॉईल हेल्थ कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात, सिंचन क्षेत्रातील 2.5 हेक्टर यूनिट क्षेत्रातून नमुना घेण्यात आला आणि बिगर सिंचन क्षेत्रातील 10 हेक्टर क्षेत्रातून एक नमुना घेण्यात आला. सन 2019-20 पासून निवडलेले नमुने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. गावातील शेतातील मातीचे नमुने घेतले जात आहेत.

माती परिक्षणाची पद्धत

  • नमुना घेण्यापूर्वी शेतात घेतलेल्या पिकांची वाढ सारखीच आहे की नाही याची पडताळी करावी
  • तर पिकाची वाढीसाठी एकसमान खतांचा वापर केला आहे की नाही याची माहिती घ्यावी
  • जर जमीन सपाट असेल तर अशा स्थितीत संपूर्ण शेतातून प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

माती आरोग्य कार्ड नमुना (Soil Health Card)

सध्या, भारत सरकारने विकसित केलेल्या सॉइल हेल्थ कार्ड ॲपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करून कृषी पर्यवेक्षकांद्वारा मातीचे नमुने गोळा करण्याचे काम ऑनलाइन केले जाते. लॅबद्वारा प्राप्त नमुन्यांचे विश्लेषण करून आणि सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलवर चाचणी निकाल प्रविष्ट करून कार्ड तयार केले जातात.

हे कार्ड शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षका मार्फत उपलब्ध करून दिली जातात. जर शेतकऱ्यांना कार्ड मिळालेले नसतील तर ते भारत सरकारच्या सॉईल हेल्थ कार्ड पोर्टलवर लॉग इन करून त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून मृदा आरोग्य कार्ड मिळवू शकतात.

error: Content is protected !!