Soil Health Card : सॉईल हेल्थ कार्ड कसे बनवायचे? पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया एका क्लिकवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृगाचा पाऊस (Soil Health Card) पडल्यानंतर, खरीप हंगामाची लगबग सुरु होणार आहे. अशातच शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे क्रमप्राप्त असणार आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 19 फेब्रुवारी 2015 पासून सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी सॉईल हेल्थ कार्ड काढायचे असल्यास, शेतकरी ते काढावे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? तसेच सॉईल हेल्थ कार्डमुळे (Soil Health Card) शेतकऱ्यांना काय फायदे होतात. याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सॉईल हेल्थ कार्डचे फायदे? (Soil Health Card Scheme For Farmers)

सॉईल हेल्थ कार्ड (Soil Health Card) योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायी योजना आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक घेण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीमध्ये कोणकोणते घटक आहे. याबाबत माहिती नसते. ज्यामुळे शेतकऱ्यांना विशिष्ट पिकासाठी मातीतील घटक पूरक आहे की नाही याबाबत कल्पना नसते. ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. परिणामी, सॉईल हेल्थ कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतल्यास, मातीतील गुणवत्तेनुसार त्यांना अधिक उत्पादन मिळवण्यास मदत होते.

कोणती कागदपत्रे लागतात?

शेतकऱ्यांना प्रत्येक तीन वर्षांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीत उपलब्ध घटक आणि पिकासाठी आवश्यक घटक यांचा अंदाज येतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रिपोर्ट कार्ड देखील दिले जाते. ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांना जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड तयार करायचे असल्यास, त्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी यांची आवश्यकता असते.

कसा कराल अर्ज?

  • सर्वप्रथम सॉईल हेल्थ कार्डसाठीच्या https://soilhealth.dac.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर तुम्हाला होम पेजवर क्लिक करावे लागेल. आणि तुमचे राज्य निवडावे लागेल.
  • तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
  • नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • त्यानंतर सर्व कागपत्रांवरील माहितीनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक युनिक यूआयडी नंबर मिळेल, म्हणजेच युनिक रजिस्ट्रेशन नंबर.

कसे बनेल तुमचे सॉईल हेल्थ कार्ड?

सॉईल हेल्थ कार्ड मिळवण्यासाठीचा अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाइन भरावा लागेल. त्यानंतर शेतकरी वेबसाइटवर मातीच्या नमुन्यांची स्थिती तपासू शकतील. त्यांना लॉग इन करण्याची गरज भासणार नाही. शेतकरी त्यानंतर आपल्या गावाचे नाव, उपजिल्हा, जिल्हा, राज्य, नाव आणि माती नोंदणी क्रमांक निवडून मातीची स्थिती तपासू शकतात. सरकारने नोंदणी प्रमाणपत्र दिल्यानंतर शेतकरी त्यांचे मृदा आरोग्य कार्ड इंटरनेटवरून प्रिंट करू शकतात. ‘प्रिंट सॉइल हेल्थ कार्ड’ टॅबवर क्लिक करून, शेतकरी त्यांचे सॉईल हेल्थ कार्ड इंग्रजी किंवा हिंदी या दोन भाषांमध्ये मिळवू शकतात.

error: Content is protected !!