7 दिवसाच्या आत मोबाईलवर मिळणार माती परीक्षण अहवाल – कृषिमंत्री धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soil Testing : रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापरामुळे राज्यातील शेतीचे आरोग्य खराब झाले असून कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करून माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्स माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह सविस्तर माहिती देईल. मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शुक्रवारी लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, बांबू टीश्यू कल्चर, बांबू फर्निचर प्रकिया उद्योगाच्या भेटीनंतर झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल, कृषी शास्त्रज्ञ अखिल रिझवी, लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बांबू लागवड चळवळ व्हावी

बांबू हे हमखास पैसे देणारे पिक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. कितीही चांगले फर्निचर केले तर त्याचे आयुष्य 15 ते 20 वर्ष असतं पण बांबूचे फर्निचरला 100 वर्ष काहीच होत नाही. त्यामुळे जगभर बांबूचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर वाढतो आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात बांबू लागवडीची चळवळ व्हायला हवी. यापुढे आपणही या बांबू लागवडीच्या चळवळीचा कार्यकर्ता असेल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगून अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे आवाहन केले.

error: Content is protected !!