Solapur News : पाऊस नसल्याने नर्सरी चालकांची अवस्था बिकट; रोपांचा खर्चही निघणे कठीण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Solapur News सध्या राज्यभर पावसाने चांगलीच दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगल्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान पाऊस नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे पाऊस नसल्याने नर्सरी मधील रोपांची कोणीही खरेदी करत नाही तर दुसरीकडे रोपवाटिका जगवण्यासाठी शेतकरी टँकरने पाणीपुरवठा करतायेत. त्यामुळे आता नर्सरी चालक दुहेरी संकटात सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान

पाऊस नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान बार्शी तालुक्यातील वाणेवाडी या ठिकाणी सचिन लोखंडे यांनी पाच वर्षांपासून रोपवाटिका सुरू केली. यावर्षी त्यांच्या रोपवाटिकेमध्ये जवळपास 70 ते 80 हजार रोपे होती. मात्र पाऊसच नसल्याने आता यांच्यावर रोपवाटिकेमध्ये फक्त दहा ते वीस हजार रुपये शिल्लक राहिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

फळ झाडांची रोप उध्वस्त

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे आंबा, जांभूळ, सीताफळ, लिंबू, पेरू अशी अनेक रोपे अक्षरशः उध्वस्त झाले असल्याची माहिती या रोपवाटिका चालकाने दिली आहे. दरवर्षी वीस ते पंचवीस लाखांचे उत्पन्न या रोपवाटिकेतून मिळत होतं. मात्र या वर्षी रोपांचा खर्च निघणे अवघड झाल्याची माहिती रोपवाटिकेचे मालक सचिन लोखंडे यांनी दिली आहे. सचिन लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवस रोपे जगण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला मात्र आता तो खर्च देखील निघणे अवघड झाल आहे. त्याचबरोबर विहीर, बोर आटले आहे. त्यामुळे रोपवाटिका जगवणे अवघड झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या ठिकाणाहून घ्या तुमच्या जवळच्या रोपवाटिकांची माहिती

शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला आपल्या जवळच्या रोपवाटिकांची माहिती नसते कधी आपल्याला जर काही रोपांची आवश्यकता भासली तर आपण इतर शेतकऱ्यांकडून रोपवाटिकांची चौकशी करत असतो. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आम्ही खास तुमच्यासाठी एक ॲप बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi हे ॲप. हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्या रोपवाटिका आहेत. याबद्दल माहिती मिळू शकतात तीही अगदी मोफत त्यामुळे लगेचच हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!