Solapur News : धक्कादायक बातमी! सोलापुरमधील कांदा अडत व्यापाऱ्याची साडे चार कोटी रुपयांची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Solapur News : सध्या सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर मधील एका कांदा अडत व्यापाऱ्याची जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदा खरेदी करून साडेचार रुपये कोटी अदा न केल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे केरळचे रहिवासी आहेत. नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन अशी या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन या दोघा भावांनी 23 ऑक्टोबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भारत ओनियन या दुकानातून कांदा खरेदी केला होता. या दोघांनी आतापर्यंत जवळपास चार कोटी रुपयांचा कांदा खरेदी केला होता. मात्र यांनी कांद्याचे कोणतेही पैसे दिलेले नाहीत. दरम्यान याबाबत कांदा अडत व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर लगेचच त्याने पोलिसात धाव घेत पोलिसांना याबद्दल सर्व माहिती सांगितली. यानंतर आता सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

चार कोटी 55 लाख 95 हजारांची फसवणूक

साजिद हुसेन अजमेरी यांच्याकडून केरळमधील दोन भावंडाने मोठ्या प्रमाणात कांदा घेतला. पहिल्यांदा ज्यावेळी यांच्याकडून कांदा घेतला त्यावेळी हे दोघे भावंडे वेळोवेळी पैसे देत होते. त्यानंतर साजिद अजमेरी यांनी विश्वासाने या दोन भाव भावंडांना 23 नोव्हेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान चार कोटी 55 लाख 95 हजारांचा कांदा विक्री केला होता. मात्र या दोन भावंडांनी विश्वासाचा फायदा घेत व्यापाऱ्याची जबर फसवणूक केली आहे.

यानंतर व्यापाऱ्याला आपली कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर 25 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर मधील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली. कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल होत असते मात्र व्यापाऱ्याची कोटींची फसवणूक झाल्यामुळे या ठिकाणी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!