Solar Pump : संपूर्ण गाव करतंय ‘सोलर’वर शेती; वीजपुरवठ्याची कटकट मिटली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि विजेचा खूप जवळचा संबंध आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठ्याची (Solar Pump) आवश्यकता असते. मात्र कधी अपुरी वीज, कधी भारनियमन तर रोहित्र जळाल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच दिवसा वीज नसेल तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचे शेतात उभे राहावे लागते. मात्र आता राज्यातील एक गाव असे आहे. ज्या संपूर्ण गावातील शेतकरी म्हणतात ‘आम्हाला तुमची वीज नकोय, आम्ही आमचे समर्थ आहोत.’ हे वाक्य ऐकून तुम्हीही विचारात पडला ना? की विजेशिवाय शेतकरी शेती करणार कसे? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, मात्र हे संपूर्ण गाव सोलर पंपाने (Solar Pump) शेती करत आहे.

सध्या गावात 425 सोलर पंप (Solar Pump In Bembale Village)

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे या गावाने राज्यातील सर्वाधिक सोलर पंप असणारे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गावात 2600 हेक्टर बागायती जमीन आहे. मात्र पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. गावातच महावितरणचे सबस्टेशन आहे. मात्र नेहमीच्या विजेच्या कटकटीमुळे शेतकऱ्यांनी वीज पंपांना रामराम ठोकला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनातून 2016 साली स्वाती जयवंत भोसले, रेखा हनुमंत भोसले, उषा भजनदास जगताप, मनीषा मोहन भोसले व उर्मिला विलास भोसले या महिलांच्या शेतात साडेसात एच. पी.चे सोलर पंप बसविण्यात आले. गावात सोलर पंपांची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी विजेचा नाद सोडला आणि सरकारी अनुदानाच्या मदतीने सोलर पंप बसवण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला बेंबळे गावात साडेसात एच. पी.चे 11, 5 एच.पी.चे 260 व तीन एच. पी. चे 155 सोलर पंप आहेत. असे एकूण 426 सोलर पंप गावात बसविण्यात आले आहेत.

सरकारी मंजुरीसाठी अडचण

सात-आठ वर्षांपूर्वी गावात केवळ 5 सोलर पंप (Solar Pump) बसविण्यात आले होते. मात्र आज गावात जवळपास 425 सोलर पंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस, केळी, डाळिंब, पेरू आणि इतर पिके फुलवली आहेत. सध्यस्थितीत गावातील उर्वरित काही शेतकरीही सोलरवर पंप अनुदानासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सरकारी मंजुरीसाठी अडचणी येत आहेत. गावात जवळपास संपूर्ण 2600 हेक्टर क्षेत्रात प्रामुख्याने ऊस, केळी, द्राक्ष, पेरू, डाळिंब व इतर पिके आहेत. गावात दूध व्यवसायही जोमात सुरु असून, दररोज 6 हजार लिटर दूध संकलन होते. आवेदन केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले तर पुढील वर्षभरात गावातील सोलर पंपाची संख्या 600 होईल. त्यानंतर संपूर्ण गावात सोलर पंपांच्या माध्यमातून दिवसभर शेतीला पाणी देता येऊ शकेल, असे बेंबळे गावातील प्रगतशील शेतकरी सांगतात.

error: Content is protected !!