हॅलो कृषी ऑनलाईन : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे देशातील ट्रॅक्टर कंपन्या (Solis Tractors) सध्या आपल्या ट्रॅक्टर विक्रीवर शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात डिस्काउंट देऊ शकतात. त्यामुळे तुम्हीही एखादा स्वस्तात पण शेतीसाठी मस्त ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर सॉलिस या कंपनीचा “Solis 4515 E” हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी कमी किमतीत दमदार ट्रॅक्टर ठरू शकतो. आज आपण “सॉलिस 4515 ई” या ट्रॅक्टरबाबत (Solis Tractors) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
“सॉलिस 4515 ई”ट्रॅक्टरबद्दल (Solis Tractors Solis 4515 E Price, Features)
सॉलिस या कंपनीचा “सॉलिस 4515 ई” या ट्रॅक्टर (Solis Tractors) जपानी टेक्नॉलॉजी E सीरीज वाला ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 3054 सीसी क्षमतेचे 3 सिलेंडर दिलेले आहेत. हा ट्रॅक्टर 48 HP पॉवरसह 205 NM टॉर्क जनरेट करतो. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग मशीन तर ड्राय टाईप एयर फिल्टर दिलेला आहे. ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पॉवर 43.45 HP आहे. जी 1900 आरपीएमची निर्मिती करते. या ट्रॅक्टरला कंपनीने 55 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. सॉलिस या कंपनीचा “सॉलिस 4515 ई” या ट्रॅक्टरला कंपनीने 2000 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 2060 किलोग्रॅम इतके आहे. हा ट्रॅक्टर कंपनीने 3590 MM लांबी, 1800-1830 MM रुंदीसह 2090 MM व्हीलबेसमध्ये तयार केलेला आहे.
“सॉलिस 4515 ई”ट्रॅक्टर वैशिष्ट्ये
“सॉलिस 4515 ई” या ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिले आहे. ज्यामुळे चालकाला रुबाबदारपणासह आरामदायी अनुभव मिळतो. या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 10 गियर आणि मागील बाजूस 5 गियर दिलेले आहे. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला Single/Dual टाइप क्लच दिलेला आहे. याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टर मल्टी डिस्क ऑईल इमर्जड ब्रेक दिलेला आहे. जो चालकाला प्रसंगी सुरक्षित अनुभव प्रदान करतो. “सॉलिस 4515 ई” हा ट्रॅक्टर रिव्हर्स पीटीओ पॉवर टेकऑफसह येतो. जो 540 आरपीएमची निर्मिती करतो. हा ट्रॅक्टर 2 WD ड्राइव ट्रॅक्टर आहे. तसेच याला कंपनीने पुढील बाजूस 6.5 X 16/6.0 X 16 आकारात तर मागील बाजूस 13.6 x 28 / 14.9 x 28 आकारात टायर दिलेले आहे.
किती आहे किंमत?
सॉलिस कंपनीने आपल्या “सॉलिस 4515 ई” या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 6.90 लाख ते 7.40 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ऑन रॉड प्राईस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळू शकते. या ट्रॅक्टरला कंपनीने 5000 तास किंवा 5 वर्ष जे आधी संपेल. त्या प्रमाणात वारंटी प्रदान केलेली आहे.