Sonalika Electric Tractor : डिझेल खर्चाला वैतागलाय? सोनालीकाचा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; वाचा किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही काळापासून सर्वच ट्रॅक्टर (Sonalika Electric Tractor) उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मिती करत आहे. यामध्ये सोनालीका ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आघाडीवर असून, सोनालिकाने तीन वर्षांपूर्वी देशात सर्वप्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करण्याची किमया केली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टरच्या डिझेल खर्चाला वैतागले असाल. किंवा मग एखादा नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोनालिकाचा ‘टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी’ हा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण सोनालिकाच्या ‘टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल (Sonalika Electric Tractor) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘या’ ट्रॅक्टरची विशेषतः? (Sonalika Electric Tractor For Farmers)

सोनालिका कंपनीने आपला ‘टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी’ हा छोटा ट्रॅक्टर (Sonalika Electric Tractor) 25.5 किलोवॅट क्षमता असलेल्या मोटरसह तयार केला आहे. जो 15 हॉर्स पावरची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरला कंपनीने एकदा चार्ज केल्यानंतर अधिक कालावधीसाठी काम करण्याची क्षमता दिली आहे. विशेष म्हणजे तो केवळ 4 तासांमध्ये फुल चार्जिंग होतो. कंपनीणे आपल्या या ट्रॅक्टरला 500 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. तसेच या ट्रॅक्टरचे एकूण वजन हे 820 किलो इतके ठेवण्यात आले आहे. सोनालिका कंपनीने आपल्या ‘टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी’ या छोट्या ट्रॅक्टरला कमीत कमी 9.46 एचपी पीटीओ पॉवरसह तयार केले आहे. त्यामुळे तो सर्व कृषी उपकरणे आणि अवजारे चालवण्यासाठी सहज कार्यक्षम आहे. कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला 1420 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

काय आहेत फीचर्स?

  • कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग दिले आहे. ज्यामुळे चालकाला ट्रॅक्टर चालवताना आरामदायी अनुभव मिळतो.
  • पुढील बाजूस 6 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • ऑइल इमर्जड ब्रेक्स देण्यात आले आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरवर तात्काळ नियंत्रण मिळवणे शक्य होते.
  • कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला 24.93 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • सोनालिकाचा हा टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 4 डब्लूडी अर्थात फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 5.0 x 12 आकारात आणि मागील बाजूस 8.00 x 18 टायर दिले आहे.
  • या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला तुम्ही नॉर्मल मोडवर ठेऊन 10 तासात चार्जिंग करू शकतात. तर फास्ट मोडवर ठेवल्यास तो केवळ 4 तासांमध्ये फुल चार्जिंग होतो.

किती आहे किंमत?

सोनालिका कंपनीने आपल्या ‘टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी’ या छोट्या ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्धारित केली आहे. यामध्ये कंपनीने संपूर्ण देशपातळीवर या ट्रॅक्टरसाठी शोरूम किंमत 5.99 लाख ते 7 लाख रुपये दरम्यान निश्चित केली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. तसेच कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5000 किलोमीटर किंवा मग 5 वर्ष जे आधी पूर्ण होईल. तितक्या क्षमतेत वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!