Sonalika Tiger 47 : ‘सोनालीका टायगर 47’ शेतकऱ्यांचा भरोसेमंद ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये ट्रॅक्टरचे महत्व वाढले असून, ट्रॅक्टर (Sonalika Tiger 47) नसेल तर शेती करणे जवळपास अशक्य आहे. कारण बैल जोडीच्या किमती देखील लाखाच्या घरात गेल्या आहे. अशातच ट्रॅक्टर घेऊन शेती करणे सोपस्कर ठरत असल्याने सध्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदीकडे कल वाढला आहे. तुम्हाला देखील आता ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही सोनालीका या कंपनीचा ‘सोनालीका टायगर 47’ हा बलवान ट्रॅक्टर खरेदी करू शकता. या ट्रॅक्टरची काय वैशिष्ट्ये आहेत? त्याची किंमत किती? आणि तो शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो. आज आपण ‘सोनालीका टायगर 47’ (Sonalika Tiger 47) या ट्रॅक्टरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

‘सोनालीका टायगर 47’ बद्दल (Sonalika Tiger 47 Farmer’s Trusted Tractor)

सोनालीका ही देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे. कंपनीने शेतकऱ्यांची गरज ओळखून ‘सोनालीका टायगर 47’ (Sonalika Tiger 47) हा 50 HP चा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे या ट्रॅक्टर रुबाबदार असल्याने त्यांने शेतकऱ्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा 1900 आरपीएमसह 50 HP पावर जनरेट करतो. त्याला कंपनीने 3065 CC इंजन क्षमतेचे 3 सिलेंडर दिले आहेत. कंपनीने ‘सोनालीका टायगर 47’ या ट्रॅक्टरला ड्राय टाईप एयर फिल्टर दिलेला आहे. जो ट्रॅक्टरला धूळ मातीपासून सुरक्षित ठेवतो. हा ट्रॅक्टर 43 HP पीटीओ पावर आणि 1900 आरपीएमची निर्मिती करू शकतो. कंपनीने या ट्रॅक्टरला 2000 किलोग्रॅम इतकी वजन उचलण्याची क्षमता प्रदान केली आहे. तसेच या ट्रॅक्टरला 65 लीटर क्षमतेची डिझेल टाकी देण्यात आली आहे. कंपनीने या ट्रॅक्टर खूप तगडा व्हीलबेस दिलेला आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर दिसायला खूप रुबाबदार दिसतो.

‘सोनालीका टायगर 47’ ची वैशिष्ट्ये

  • ‘सोनालीका टायगर 47’ या ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • या ट्रॅक्टरला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गियर देण्यात आले आहे.
  • तसेच कंपनीने ट्रॅक्टरला सिंगल क्लच दिलेला आहे.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मल्टी डिस्क ऑइल इमर्जड ब्रेक दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला तुम्हाला रिव्हर्स पीटीओ टाईप पॉवर टेकऑफ देखील पाहायला मिळते. जी 540 आपीएम जनरेट करते.
  • ‘सोनालीका टायगर 47’ ट्रॅक्टरला कंपनीने 6.0 x 16 / 6.5 x 16 / 7.5 x 16 अशा आकारात पुढील टायर आणि 14.9 x 28 या आकारात मागील टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

सोनालीने कंपनीने आपल्या ‘सोनालीका टायगर 47’ या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 7.27 लाख ते 7.59 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागात ऑन रोड प्राईस ही वेगवेगळी असू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5000 तास पूर्ण किंवा मग 5 वर्ष जे आधी पूर्ण होईल. तितक्या क्षमतेत वारंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!