Sonalika Tractor : सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचा दबदबा कायम; आर्थिक हिस्सात 15.3 टक्केपर्यंत वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ही भारतातील टॉपची अर्थात क्रमांक एकची ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी केंद्रित धोरणे राबविल्याने आणि शेतकऱ्यांसोबत असलेली बांधिलकी जपली आहे. ज्यामुळे गेल्या 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये सोनालीका कंपनीला देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 15.3 टक्के आर्थिक हिस्सा मिळवण्यात यश मिळाले आहे. जो इतर कोणत्याही ट्रॅक्टर कंपनीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता कंपनीने पुढील 2024-25 या आर्थिक वर्षात सध्याच्या आर्थिक हिश्श्यापेक्षा (Sonalika Tractor) अधिक वाढ नोंदवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

काय आहे कंपनीची योजना? (Sonalika Tractor 15.3 % Economic Share)

याबाबत सोनालीका ट्रॅक्टर (Sonalika Tractor) कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटले आहे की, सोनालीका कंपनीने देशांतर्गत बाजारातील सर्वाधिक 15.3 टक्के आर्थिक हिस्सा मिळवण्यात यश मिळाले आहे. कंपनीच्या या विक्रमाशिवाय कंपनीने देशातील ट्रॅक्टर निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक वर्ष 2024 मध्ये नोंदवलेला 34.4 टक्के निर्यात बाजाराचा देखील समावेश आहे. ज्यात 6.2 टक्क्यांची वाढी नोंदवली गेली आहे. परिणामी आता, कंपनी पंजाबमधील होशियारपूर येथे दोन नवीन प्रकल्प उभारण्यासाठी 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक योजना सुरू करत आहे. हा जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर प्लांट ठरणार आहे.

निर्यात विक्रीतही दबदबा

सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे ​​सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल यांनी म्हटले आहे की, देशांतर्गत बाजारात आर्थिक वर्ष 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी हेवी-ड्युटी ट्रॅक्टर आणि आधुनिक उपकरणांच्या पूर्ततेतून सर्वाधिक 15.3 टक्के आर्थिक हिस्सा मिळवणे, ही कंपनीसाठी गौरवास्पद बाब आहे. जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर बाजारपेठ असलेल्या भारतात, इतर कंपन्यांना मागे टाकणारा आणि वाढ नोंदवणारा एकमेव ट्रॅक्टर ब्रँड म्हणून आपल्याला आनंद होत आहे. देशांतर्गत कामगिरीसह कंपनीने निर्यात कामगिरीतही बाजारपेठेत 34.4 टक्के उसळी घेत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.

भारतातून देशाबाहेर वाढत्या ट्रॅक्टर निर्यातीमुळे आम्हाला ट्रॅक्टर निर्मिती उद्योगातील आमचे नेतृत्व पोहचवण्यासाठी आत्मबळ मिळत आहे. कंपनीचे बहुतांश तंत्रज्ञान भारतात बनवलेले आहेत. त्यामुळे ते भविष्यासाठी मोठे मदतगार ठरणार आहे. कंपनीच्या यंदाच्या अतुलनीय कामगिरीमुळे एक संस्था म्हणून आपले नेटवर्क मजबूत कंपनीला आणखी मदत होणार आहे. असेही रमण मित्तल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!