Sonalika Tractor : सोनालिकाचा 55 एचपी पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा… किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनीने विविध रेंजमध्ये शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनालीकाचे दमदार ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा दमदार आणि रुबाबदार ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर सोनालिका कंपनीचा 55 एचपीचा ‘सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टर (Sonalika Tractor) शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण या ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत..

‘आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टरची विशेषतः? (Sonalika Tractor For Farmers)

सोनालीका कंपनीने आपल्या ‘सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टरची (Sonalika Tractor) निर्मिंती 4 सिलेंडरसह केली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग सिस्टिम दिली आहे. हा ट्रॅक्टर 55 एचपी पॉवर जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल बाथ/ ड्राय टाईप विथ प्री क्लिनर एयर फिल्टर देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला कमीत कमी 47 एचपी 2000 आरपीएमची निर्मिती करतो. सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स ट्रॅक्टरला कंपनीने 2000 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 65 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे. कंपनीने आपल्या या 55 एचपी ट्रॅक्टरला मजबूत व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

‘आरएक्स 55 डीएलएक्स’ची फीचर्स

सोनालिका ‘आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टरला (Sonalika Tractor) पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्युअल क्लच देण्यात आला आहे. जो कॉन्स्टंट मेश विथ साईड शिफ्टर टाइप ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. सोनालीने कंपनीने सोनालिका ‘आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स देण्यात आले आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरला चटकन नियंत्रणात आणण्यात मदत होते. सोनालिकाचा आरएक्स 55 डीएलएक्स टू व्हील ड्राइवसह येतो. या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 7.5 X 16 आकारात आणि 16.9 x 28 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

सोनालीका कंपनीने आपल्या ‘सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स’ या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 8.43 लाख ते 8.95 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने, ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5 वर्ष इतकी वॉरंटी दिली आहे.

error: Content is protected !!