Sonalika Tractor : ‘एक देश, एक ट्रॅक्टर किंमत’ उपक्रमासह सोनालिकाचा सिकंदर DLX DI 60 ब्रँड लॉन्च!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने (Sonalika Tractor) ‘एक देश, एक किंमत’ उपक्रम सुरु केला आहे. ज्याअंतर्गत सोनालिकाचा सिकंदर डीएलएक्स डीआय 60 ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे. ज्याची शोरूम किंमत 8,49,999 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर अतिशय कठीण जमिनीमध्ये चांगल्या काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सोनालिका कंपनीच्या पंजाबमधील होशियारपुर येथील कंपनीच्या जगातील प्रथम क्रमांकाच्या प्लांटमध्ये या ट्रॅक्टरची (Sonalika Tractor) निर्मिती करण्यात आली आहे.

काय आहे विशेषतः? (Sonalika Tractor One Country, One Tractor Price)

सोनालिकाचा सिकंदर डीएलएक्स डीआय 60 हा शक्तीशाली ट्रॅक्टर (Sonalika Tractor) असून, तो 4,709 सीसी क्षमतेसह, 4 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. जो 275 एनएम टॉर्क जनरेट करतो. हा ट्रॅक्टर पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 12 गिअरसह उपलब्ध आहे. त्याला कंपनीकडून 5G हाइड्रोलिक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 2,200 किलोग्रॅम वजन उचलू शकतो. या ट्रॅक्टरला कंपनीने एलईडी डीआरएल हेडलाइट, लेड टेल लाइट, प्रो+ बंपर, डीलक्स सीट आणि पॉवर स्टीयरिंग दिली आहे. सोनालीका सिकंदर डीएलएक्स डीआय 60 टॉर्क प्लस मल्टी-स्पीड ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या शेतीमधील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

कंपनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सोनालीने कंपनीने ”एक देश, एक ट्रॅक्टर किंमत” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. हा ट्रॅक्टर लाँच करताना अभिमान वाटत आहे. कारण कंपनीने शेतकऱ्यांना सोनालिकाचा सिकंदर डीएलएक्स डीआय 60 हा ट्रॅक्टर मल्टी-स्पीडसह उपलब्ध करून दिला आहे. जे शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्यासाठी लवचिकता प्रदान करतो, असे सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे ​​सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी आदर्श ट्रॅक्टर

सोनालीका कंपनीने ट्रॅक्टर उद्योगामध्ये क्रांती घडवून आणली आहे. कंपनीने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे इंजिन ऑफर केले आहे. ज्यास पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 12 गिअर देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने ट्रॅक्टरला अत्याधुनिक हायड्रॉलिक सिस्टीम दिलेली आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ट्रॅक्टर बनतो. ज्यास कंपनीकडून एकाच किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर उद्योगातील अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम असल्याचेही रमण मित्तल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!