Sonalika Tractors : ‘सोनालिका 42 RX सिकंदर’ची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालिका ही देशातील आघाडीची ट्रॅक्टर (Sonalika Tractors) कंपनी असून, पहिल्या तीन ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये तिची गणना होते. विशेष म्हणजे भारतीय शेतकऱ्यांमध्ये सोनालिकाच्या दमदार असलेल्या मोठ्या ट्रॅक्टर्सची क्रेझ आहे. देशातील अशाच शेतकऱ्यासांठी सोनालीका कंपनीने आपला ‘सोनालिका 42 आरएक्स सिकंदर’ हा ट्रॅक्टर तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर मागील काही कालावधीपासून शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे आज आपण ‘सोनालिका 42 RX सिकंदर’ या ट्रॅक्टरबद्दल (Sonalika Tractors) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

‘सोनालिका 42 RX सिकंदर’ची वैशिष्ट्ये (Sonalika Tractors For Farmers)

सोनालिका 42 आरएक्स सिकंदर हा ट्रॅक्टर (Sonalika Tractors) 3 सिलिंडर आणि 45 एचपीसह येतो. याशिवाय या ट्रॅक्टरमध्ये 1800 इंजिन रेटेड आरपीएम देण्यात आले आहे. ज्यामुळे हा एक आकर्षक ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये एअर फिल्टरसाठी ड्राय प्रकार देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा पीटीओ 35.7 एचपी आहे. सोनालिका 42 आरएक्स सिकंदर हा एक मजबूत आणि टिकाऊ ट्रॅक्टर आहे. तो शेतातील सर्वात मोठे आणि कठीण कामही सहजपणे पूर्ण करतो. या ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच आणि 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय या ट्रॅक्टरला 12V 70AH ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे तो शेतकऱ्यांसाठी अत्यंत खास मानला जातो. सोनालिका 42 आरएक्स सिकंदर ट्रॅक्टरला कंपनीने 55 लिटरची डिझेल टाकी दिलेली आहे. हा ट्रॅक्टर शेतामध्ये काम करताना उत्तम मायलेज देतो. तसेच तो 1800 किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत रुबाबदार ट्रॅक्टर म्हणून समोर आला आहे.

किती आहे किंमत?

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कंपनीने सोनालिका 42 आरएक्स सिकंदर ट्रॅक्टरमध्ये काही आवश्यक उपकरणे देखील उपलब्ध करून दिले आहेत. जी शेतकरी गरजेच्या वेळी सहजपणे वापरू शकतात. इतर साधनात टूल, टॉपलिंक, कॅनोपी, हुक, बंपर, ड्रॉ बार इ. साहित्याचा समावेश आहे. तर कंपनीने या ट्रॅक्टरची किंमत अत्यंत कमी ठेवली असून, शेतकऱ्यांना अत्यंत कमी पैशात दमदार आणि रुबाबदार सोनालिका 42 आरएक्स सिकंदर ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने ‘सोनालीका 42 RX सिकंदर’ची शोरूम किंमत 5.40 लाख ते रु. 5.75 लाख दरम्यान ठेवली आहे. ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ऑन प्राईसमध्ये बदल होऊ शकतो.

error: Content is protected !!