Sonalika Tractors : सोनालीकाचा छोटा ट्रॅक्टर, कमी इंधनात अधिक काम; वाचा.. किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये (Sonalika Tractors) सध्या द्राक्ष काढणी हंगाम सुरू आहे. तर काही भागांमध्ये कांदा विक्री, काही ठिकाणी शेतकरी कापूस विक्री करत आहे. त्यामुळे आता पीक विक्री झाल्यानंतर तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर खरेदी करण्याचे ठरवले असेल तर तुमच्यासाठी सोनालीका कंपनीचा ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ हा छोटा ट्रॅक्टर योग्य पर्याय ठरणार आहे. 32 एचपीचा असलेला छोटा ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये अधिक काम करतो. फळबाग शेती आणि कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर परफेक्ट मानला गेला आहे. त्यामुळे आज आपण ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ या छोट्या ट्रॅक्टरबद्दल (Sonalika Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘या’ छोट्या ट्रॅक्टरची विशेषतः? (Sonalika Tractors More Work With Less Fuel)

सोनालीका कंपनीने आपल्या ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ या छोट्या ट्रॅक्टरला (Sonalika Tractors) 2780 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये तयार केले आहे. तसेच त्याला वॉटर कुलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. सोनालीका कंपनीचा हा ट्रॅक्टर 32 एचपीचा असून, तो कमीत कमी 27.5 एचपी पीटीओ पॉवरसह 2000 आरपीएमची निर्मिती करतो. तसेच कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 1336 किलो वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने एकूण 1570 किलो वजनासह तयार केले आहे. तर हा ट्रॅक्टर 1720 एमएम व्हीलबेसमध्ये तयार करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीकडून आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 315 एमएम ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

सोनालीका कंपनीने आपल्या ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ या छोट्या ट्रॅक्टरला मेकॅनिकल/पॉवर अशी दोन्ही प्रकारात स्टीयरिंग दिली आहे. ज्यामुळे चालकाला ट्रॅक्टर चालवताना आरामदायी अनुभव जाणवतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 10 गिअर आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स दिला आहे. तसेच या ट्रॅक्टरला सिंगल क्लच देण्यात आला आहे. जो कॉन्स्टन्ट मेश टाइप ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे.

सोनालीका कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 2.41 ते 34.03 किमी प्रति तास तर मागील बाजूस 3.54 ते 13.93 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे. याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टरला ड्राय डिस्क/ऑइल इमर्जड ब्रेक्स दिला आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरला पटकन नियंत्रणात आणण्यास मदत होते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला टू व्हील ड्राइवसह तयार केले आहे. तसेच त्याला पुढील बाजूस 5.0 x 15 आकारात तर मागील बाजूस 12.4 x 24 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

सोनालीका कंपनीने आपल्या ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ या छोट्या ट्रॅक्टरची (Sonalika Tractors) शोरूम किंमत 5.28 लाख ते 5.59 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे वेगवेगळ्या भागांमध्ये या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राहू शकते. असे कंपनीने म्हटले आहे. तसेच कंपनीने आपल्या या 32 एचपी छोट्या ट्रॅक्टरला 5000 तास किंवा 5 वर्ष जे अगोदर संपेल. इतक्या क्षमतेत वॉरंटी प्रदान केली आहे.

error: Content is protected !!