हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन (Soya Milk), कापूस या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. दुर्दैवाने या भागामध्ये आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, सोयाबीन या पिकात शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्याची सक्षम आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्व ठिकाणी कसा वापर वाढवता येईल. यासाठी धोरण ठरवून छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर सोया मिल्क (Soya Milk) अर्थात सोयाबीन दूध सर्व विभागांच्या पोषण आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
प्रकल्पांना मान्यता देणार (Soya Milk Dhananjay Munde)
मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सोयाबीन (Soya Milk) उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. त्यापासून खाद्यतेल निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणात प्रथिने उपलब्ध होतात. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीबीओ निवडीचे लक्षांक शिथिल केलेले आहे. या विभागातील जिल्ह्यांमधून शेतकरी उत्पादक कंपन्याचे सोयाबीन प्रक्रिया- सोयाबीन दूध, सोयाबीन टोफू याबाबतचे प्रस्ताव आल्यास प्रकल्पाच्या निकषाप्रमाणे मान्यता देण्यात येईल. असेही कृषिमंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.
बाजारपेठ उपलब्ध करून देणार
सध्यस्थितीत सोयाबीन दूध- दही- टोफू उत्पादन युनिट 100 किलो प्रती तास या मशिनरीचे मापदंड 30 लाख रुपये आहे. सोयाबीन पिकाच्या (Soya Milk) प्रक्रिया केलेल्या पदार्थाला स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. या गोलमेज परिषदेमध्ये सोयामिल्क छत्तीसगडच्या धर्तीवर सर्व विभागांच्या पोषण आहारात घ्यावे. पॅकेजिंग कॉस्ट मोठी आहे. त्यामुळे प्लास्टिक पाऊच आणि नियमित पुरवठा सुरु केला पाहिजे. जीएसटी 12 टक्के आहे त्याचा विचार व्हावा. अंडी, दूध जसे पोषक आहे तसेच सोयाबीन पोषक तत्वानी भरपूर असल्यामुळे त्याचे मार्केटिंग व्हावे. सोशल मीडिया प्रचारक, आहारातज्ञ यांच्या मार्फत प्रसार व्हावा, आदी विषयांवर चर्चा झाली आहे.
या गोलमेज परिषदेला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर आणि सोयाबीन प्रक्रियादारांचे प्रतिनिधी फूड चेनच्या चिन्मयी देऊळगावकर, चेतन भक्कड, अमोल धवन उपस्थित होते.